ETV Bharat / city

बाबरी मशीद निकाल हा देशहिताचा नाही, लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल - प्रकाश आंबेडकर

author img

By

Published : Sep 30, 2020, 8:36 PM IST

vanchit bhaujan aaghadi leader prakash ambedkar on sc decision babri masjid demolition case
बाबरी मशीद निकाल हा देशहिताचा नाही, लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल

न्यायालय असे निकाल देत राहिले तर हे देशहिताचे नाही. लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडून जाईल. धार्मिकतेला वाव दिला जात असून देशाला खाली दाखविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या या निकालाला पुन्हा अपिलात गेले पाहिजे व तथ्यांच्या आधारावर ज्यांनी बाबरी मशीद पाडली आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही शेवटी आंबेडकर यांनी सांगितले.

मुंबई - बाबरी मशीद पाडणे हे नियोजित षड्यंत्र नव्हते. त्यामुळे ३२ लोकांना विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष सोडले आहे. मात्र, लालकृष्ण आडवाणी यांनी काढलेली रथयात्रा ही बाबरी मशीद पाडण्यासाठीच होती. त्यामुळे न्यायालयाने दिलेला हा निकाल देशहिताचा नसून अशा निकालामुळे लोकांचा न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वास उडून जाईल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

बाबरी मशीद निकाल हा देशहिताचा नाही, लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल

हेही वाचा - 'मराठा आरक्षणासाठी ओबीसीमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत पडू नका'

अयोध्या, बाबरी मशीद प्रकरणावर आज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला असून यामध्ये प्रामुख्याने लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह ३२ लोकांवर बाबरी मशीद पाडल्याचा आरोप होता. दरम्यान आज आलेल्या निकालांमध्ये सर्वाना निर्दोष सोडून देण्यात आले आहे. न्यायालय असे निकाल देत राहिले तर हे देशहिताचे नाही. लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडून जाईल. धार्मिकतेला वाव दिला जात असून देशाला खाली दाखविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या या निकालाला पुन्हा अपिलात गेले पाहिजे व तथ्यांच्या आधारावर ज्यांनी बाबरी मशीद पाडली आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही शेवटी आंबेडकर यांनी सांगितले.

हेही वाचा - चैत्यभूमीची तातडीने दुरुस्त करून भंतेजींचे स्थलांतर करा ! - मुंबई महापालिकेचे राज्य सरकारला पत्र

उत्तरप्रदेश सरकार महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही

उत्तर प्रदेशमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असून यावरून असे स्पष्ट होते. तसेच उत्तर प्रदेश सरकार महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही, अशा योगी सरकारचा आम्ही धिक्कार करतो, असेही आंबेडकर यांनी म्हटले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.