ETV Bharat / city

Amit Shah Visit Lalbagh Raja : अमित शाहांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन; 'मिशन BMC' सुरू?

author img

By

Published : Sep 5, 2022, 12:01 PM IST

Updated : Sep 5, 2022, 1:15 PM IST

Amit Shah Visit Lalbagh Raja
केंद्रीय गृहमंत लालबागच्या राजाचं दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लालबागच्या राजाचं Amit Shah took Lalbagh Raja Ganapati darshan in Mumbai दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी हात जोडून बाप्पासमोर प्रार्थना केली आणि राजाच्या चरणी डोकं टेकलं. अमित शाह यांनी लालबागच्या राजाच्या चरणी दर्शन घेतलं तेव्हा त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. Union Minister Amit Shah took Lalbagh Raja Ganapati darshan in Mumbai

मुंबई केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लालबागच्या राजाचं दर्शन Amit Shah took Lalbagh Raja Ganapati darshan in Mumbai घेतलं. यावेळी त्यांनी हात जोडून बाप्पासमोर प्रार्थना केली आणि राजाच्या चरणी डोकं टेकलं. अमित शाह यांनी लालबागच्या राजाच्या चरणी दर्शन घेतलं तेव्हा त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

अमित शाह रविवारी मुंबईत दाखल झाले - यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन,आमदार प्रवीण दरेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार, राजशिष्टाचार विभागातील वरिष्ठ अधिकारी, पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी यांसह इतर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

रोहित शेट्टींनी घेतली अमित शहांची भेट प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केंद्रीय गृहमंत्री Union Home Minister अमित शहा यांची मुंबईतील सह्याद्री या गेस्ट हाऊसमध्ये भेट Director Rohit Shetty meets Amit Shah घेतली. या भेटी मागचं कारण अजून स्पष्ट झालं नसलं, तरी सुद्धा अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर असल्याकारणाने त्यांच्याबरोबर ही भेट झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे. या भेटीत नक्की काय झालं, याबाबत अजून स्पष्टीकरण समोर आलेलं नाही आहे. अमित शहा मुंबई दौऱ्यावर असल्याकारणाने अनेक भाजप खासदार, नेते अमित शहा यांची भेट घेत आहेत.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठरणार रणनीती - केंद्रीय मंत्री अमित शहा हे बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत आले असले तरी, या दौऱ्यामागे मुंबई महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुका हेदेखील एक महत्त्वाचं कारण आहे. शिवसेनेची खरी ताकद ही मुंबई महानगरपालिकेवर असलेली सत्ता आहे. त्यामुळे होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला सत्तेतून पायउतार करण्यासाठी अमिषाचा या दौऱ्यामध्ये खास रणनीती आखली जाणार आहे. यासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीचे महत्त्वाची बैठक ठेवण्यात आली आहे. या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वात महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील. Union Minister Amit Shah took Lalbagh Raja Ganapati darshan in Mumbai

हेही वाचा Rohit Shetty meets Amit Shah : दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी घेतली अमित शहा यांची भेट

Last Updated :Sep 5, 2022, 1:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.