ETV Bharat / city

मलाडमधील तरुणांना इसिसमध्ये भरती केल्याप्रकरणी दोन आरोपींना आठ वर्षाचा सक्त कारावास

author img

By

Published : Jan 7, 2022, 5:09 PM IST

Islamic State ISIS
Islamic State ISIS

मालाडमधील मालवणी येथील तरुणांना इस्लामिक स्टेट ISIS मध्ये पाठवण्यात आणि त्यांना कट्टर इस्लामीवादी बनवल्याचा आरोप असलेल्या रिझवान अहमद आणि मोहसीन सय्यद यांनी मागील सुनावणी दरम्यान न्यायालयासमोर आपले गुन्हा कबूल केला होता. त्यांनी दिलेल्या लेखी कबुली जबाबावर बुधवारी सुनावणी पार पडली व यासंदर्भात त्यांना आज शिक्षा सुनावण्यात आली. विशेष NIA कोर्टाने या दोन्ही आरोपींना 8 वर्षाचा सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

मुंबई - मालाडमधील मालवणी येथील तरुणांना इस्लामिक स्टेट ISIS मध्ये पाठवण्यात आणि त्यांना कट्टर इस्लामवादी बनवल्याचा आरोप असलेल्या रिझवान अहमद आणि मोहसीन सय्यद यांना आज विशेष NIA कोर्टाने या दोन्ही आरोपींना 8 वर्षे सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मागील सुनावणीदरम्यान आरोपींनी न्यायालयासमोर आपला गुन्हा कबूल केला होता. न्यायालयाने त्यावेळे लेखी स्वरुपात द्यायला सांगितल्यानंतर आरोपींनी न्यायालयात लेखी स्वरूपात अर्जाद्वारे आरोप कबूल केले होते. त्यानंतर त्या अर्जावर आज झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. विशेष एनआयए न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी ही शिक्षा सुनावली आहे.


काय आहे प्रकरण -

अहमद आणि सय्यद यांच्यावर मालवणी येथील अयाज सुलतान, मोहसीन, अब्दुल बशीर आणि नूर मोहम्मद या तरुणांना 2015 मध्ये इस्लामिक स्टेटमध्ये सामील होण्यासाठी भडकावल्याबद्दल खटला चालवला जात आहे. तपास यंत्रणांनी सांगितले की अहमद हा भारतातील ISIS विंगचा सेकंड-इन-कमांड होता. या खटल्यात 220 हून अधिक साक्षीदार आहेत.

फिर्यादीचे दावे फेटाळताना, अहमदने 2013 मध्ये आरोपी आयाज मोहम्मदचे कथित कट्टरपंथीकरण सुरू झाले तेव्हा तो लहान होता असा दावा केला होता. फिर्यादीने आरोप केला होता की सय्यद, सुतार नूर मोहम्मद आणि भाजी विक्रेत्याचा मुलगा वाजिद शेख हे डिसेंबर 2015 मध्ये बेपत्ता झाले होते आणि तिघांनी ISIS मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.