ETV Bharat / city

हुतात्मा स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वाहिली आदरांजली

author img

By

Published : Nov 21, 2020, 3:01 PM IST

Martyrs' Memorial Day
हुतात्मा स्मृती दिन

महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.

मुंबई - महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राजशिष्टाचार राज्यमंत्री अदिती तटकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव संजय कुमार, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Martyrs' Memorial Day
हुतात्मा स्मृती दिन

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी जनतेने सर्वस्व पणाला लावून लढा दिला. या लढ्यात 107 हुतात्म्यांनी आपले प्राणार्पण केले. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी 21 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळला जातो.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनही अभिवादन -
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झाले पाहिजे ही सर्व महाराष्ट्रप्रेमींची इच्छा होती. राज्यातील जनतेने एकजुटीने, प्राणपणाने लढून ती इच्छा पूर्ण केली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा महाराष्ट्राचा गौरवशाली, प्रेरणादायी इतिहास असून सीमाभागातील मराठी भाषिक गावांसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यातून बळ मिळेल, असे अजित पवार म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.