ETV Bharat / city

एकनाथ खडसेंची 9 तासांपासून ईडीकडून चौकशी सुरू

author img

By

Published : Jul 8, 2021, 6:50 AM IST

Updated : Jul 8, 2021, 10:26 PM IST

big breaKING
बिग ब्रेकिगं

22:25 July 08

वर्धा : वर्षभरात सायबर शाखेने शोधून काढले 108 मोबाईल; मूळ मालकांना केले परत

वर्धा - - वर्षभरात सायबर शाखेने 108 मोबाईल शोधून काढले आहेत. मोबाईल मालकांशी संपर्क करत पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलवून हे मोबाईल परत केले आहेत. 11 लाख 20 हजार रुपये किमतीचे 108 मोबाईल मूळ मालकांना परत केले आहेत. जिल्ह्यात अनेकांनी मोबाईल हरवल्याच्या तक्रारी केल्या होत्या.  

20:17 July 08

एकनाथ खडसेंची ईडीकडून 9 तासांपासून चौकशी सुरू

मुंबई - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची आज ईडीकडून चौकशी केली जात आहे. ईडीच्या कार्यालयात 9 तासांपासून ही चौकशी सुरू आहे.    

18:34 July 08

जुन्नर : पावसाअभावी करपू लागलेल्या तीन एकर सोयाबीनवर शेतकऱ्याने फिरवला ट्रॅक्टर

जुन्नर - पुणे जिल्ह्यात सध्या पावसाने दडी मारली आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिकं करपू लागली आहेत. पावसाअभावी करपू लागलेल्या तीन एकर सोयाबीन पीकावर शेतकऱ्याने ट्रॅक्टर फिरवला आहे. 

17:08 July 08

नागपुरात पावसाची जोरदार हजेरी

नागपूर - अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज नागपुरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग 8 तास झालेल्या मुसळधार पावसाने अनेक खोलगट भागात पावसाचे पाणी शिरल्याच्या तक्रारी आल्या आहेत. सकाळपासूनच पावसाचा जोर जास्त असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस सायंकाळी ४ पर्यंत सुरूच होता. त्यामुळे सकल भागात पाणी साचले होते. हवामान विभागाने आज नागपूर जिल्ह्याकरिता ऑरेंज अलर्ट घोषित केला असून, उद्याही विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 

16:58 July 08

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची संचित रजेसाठी नागपूर खंडपीठात धाव

नागपूर - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (डॅडी)  याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 28 दिवसांची संचित रजा (फरलो)  मिळावी यासाठी याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने  याचिकेबाबत सुनावणी करताना, राज्य सरकारला तीन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती व्ही एम देशपांडे आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या समक्ष न्यायालयात सुनावणी झाली.

16:50 July 08

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास मान्यता

पंढरपूर - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक झाली. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मंदिराचा DPR बनवण्याचे काम सुरू आहे. पंधरा दिवसात हा DPR मंदिर समितीकडे येणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे प्राचीन स्वरुप जपण्यात येणार आहे. तसेच संत नामदेव पायरीचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या मंदिराचे पहिल्यांदाच स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास मान्यता दिल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.  

15:42 July 08

गावागावात शिवसंपर्क अभियान राबवा; मुख्यमंत्री ठाकरे यांचे शिवसेना जिल्हाप्रमुखांना आदेश

मुंबई - गावागावात शिवसंपर्क अभियान राबवा. तसेच गावे कोरोनामुक्त करण्याच्या उद्देशाने काम करा, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांचे शिवसेना जिल्हाप्रमुखांना केल्या आहेत. 

15:36 July 08

मराठी उमेदवारांना डावलून रेल्वेकडून परप्रांतीयांना नोकरी; मनसेची मध्य रेल्वे मुख्यालयावर धडक

मुंबई - 398 मराठी उमेदवारांना डावलून रेल्वेकडून परप्रांतीयांना नोकरी देण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यामुळे मनसेने मध्य रेल्वे मुख्यालयावर धडक मोर्चा काढला. सात दिवसांचा अल्टिमेटम मनसेने रेल्वे प्रशासनाला दिला आहे.  

15:29 July 08

गोंदिया; नक्षलवाद्यांना विस्फोटक साहित्य पुरवणाऱ्या 8 आरोपींना अटक

गोंदिया - नक्षलवाद्यांना विस्फोटक साहित्य आणि हत्यार पुरवठा करणाऱ्या आठ आरोपींना बालाघाट पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

13:27 July 08

खडसे यांच्या सोबत त्यांच्या कन्या शारदा चौधरी देखील ईडी कार्यालयात

खडसे आपल्या वकिलांसह ईडी कार्यालयात पोहचले आहेत. खडसे यांची ईडी कडून चौकशी सुरू कऱण्यात आली असून खडसे यांची मुलगी शारदा चौधरी देखील ईडी कार्यालयात पोहोचल्या

 आहेत.

13:26 July 08

398 मराठी विद्यार्थ्यांना रेल्वेने नोकरीपासून डावलले; मनसे आक्रमक

मुंबई - 398 मराठी विद्यार्थ्यांना रेल्वेने नोकरीपासून डावलले; रेल्वे विरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या घेऊन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांची भेट घेतली आहे. 

12:54 July 08

नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री (MSME) पदाचा कार्यभार स्वीकारला

11:53 July 08

आईचा खून करून शरीराचे तुकडे करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा

कोल्हापूर -  आईचा खून करून शरीराचे तुकडे करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  सुनील रामा कुचीकोरवी असे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नराधम कुपूत्राचे नाव आहे. आईच्या शरीराचे तुकडे केल्यानंतर तो खाण्याचा धक्कादायक प्रयत्न त्याने केला होता. दुर्मिळातील दुर्मिळ घटना समजून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय नराधमाला फाशीची शिक्षा ठोठावली  आहे.

11:51 July 08

डॉ. भारती प्रवीण पवार यांनी स्वीकारला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा राज्यमंत्री पदाचा पदभार

भारती प्रवीण पवार
भारती प्रवीण पवार

11:45 July 08

रावसाहेब दानवे यांनी स्वीकारला रेल्वे राज्यमंत्री पदाचा पदभार

रावसाहेब दानवे यांनी स्वीकारला रेल्वे राज्यमंत्री पदाचा पदभार
रावसाहेब दानवे यांनी स्वीकारला रेल्वे राज्यमंत्री पदाचा पदभार

11:02 July 08

एकनाथ खडसे ईडी चौकशीला सामोरे; कार्यालयात दाखल

एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केल्यानंतर बुधवारी ईडीने खडसे यांनाही समन्स बजावले होते. त्यानंतर एकनाथ खडसे आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत. पुणे येथील भूखंड घोटाळ्याची चौकशी प्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. याच प्रकरणी  याआधी पाच वेळा चौकशी झाली असल्याची माहिती एकनाथ खडसे म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यामुळे चौकशी सुरू झाली असल्याचेही  खडसे म्हणाले.

10:58 July 08

नारायण राणे आज स्वीकारणार केंद्रीय मंत्री पदाचा पदभार

भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी बुधवारी मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारवेळी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे लघू व मध्यम उद्योग विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावेळी नारायण राणे यांनी ही संधी दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले. तसेच त्यांच्या मार्गदर्शनात आज सकाळी ११.३० वाजता त्यांच्या खात्याचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली.

10:30 July 08

महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाचा आकडा साडे तीन कोटीच्या पुढे

महाराष्ट्रात बुधवारी राज्यात एकूण ६ लाख ३५ हजार ३९० जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. तर बुधवारपर्यंत एकूण 3 कोटी 54 लाख ४५ हजार २४३ नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. 

09:07 July 08

नंदुरबारमध्ये दुचाकींची जोरदार धडक; पाच जण ठार

नंदुरबार - तळोदा तालुक्यातील तळवे रोडवर दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये  5 जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. अपघातात एका आई आणि लेकाचा तर एका पिता-पुत्र मृत्यू झाला आहे.

06:45 July 08

एकनाथ खडसेंच्या प्रकृतीत बिघाड; आजची मुंबईतील पत्रकार परिषद रद्द

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची प्रकृती बुधारी रात्री खालावली. त्यामुळे त्यांची आज(गुरुवाारी) होणारी पूर्वनियोजित पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. पुण्यातील भूखंड घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीने अटक केल्यानंतर खडसे यांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर खडसे हे आज मुंबईतील नवीन राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषद घेणार होते. मात्र त्यांची तब्येत बिघडल्याने ती रद्द करण्यात आली आहे. या बाबत राष्ट्रवादीच्या ट्विटरवरून माहिती देण्यात आली आहे.

06:12 July 08

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; राज्यातील जिल्ह्याधिकाऱ्यांशी चर्चा

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांची कोविडच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक पार पडली.

Last Updated :Jul 8, 2021, 10:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.