ETV Bharat / city

बंडखोर शिवसेना आमदारांचे सदस्यत्व रद्द करू नये, अपक्ष आमदारांचे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र

author img

By

Published : Jun 24, 2022, 5:19 PM IST

assembly
विधान भवन

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करू नये ( 12 Rebel MLA Not To Be Suspended ) या मागणीचे पत्र दोन अपक्ष आमदारांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ ( independent mla's Letter To Narhari Zirwal) यांना दिले आहे. विधान भवन येथे जाऊन अपक्ष आमदार महेश बादली आणि विनोद अग्रवाल यांनी हे पत्र नरहरी झिरवळ यांना दिले आहे.

मुंबई - शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करू नये या मागणीचे पत्र दोन अपक्ष आमदारांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिले आहे. विधान भवन येथे जाऊन अपक्ष आमदार महेश बादली आणि विनोद अग्रवाल यांनी हे पत्र नरहरी झिरवळ यांना दिले आहे. शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्यानंतर बंडखोर आमदारांच्या गटातील 12 आमदारांचे सदस्यत्व रद्द करावे यासाठी शिवसेनेकडून पत्र ( Shiv Sena's Letter To Narhari Zirwal ) देण्यात आले होते. यानंतर या दोन अपक्ष आमदारांकडून त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ नये यासाठी हे पत्र देण्यात आले.

अपक्ष आमदारांचे उपाध्यक्षांना पत्र - शिवसेनेकडून बंडखोर आमदारांच्या गटातील 12 आमदारांचे सदस्यत्व रद्द करावे यासाठी पत्र देण्यात आले . यानंतर या दोन अपक्ष आमदारांकडून त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ नये यासाठी हे पत्र लिहिले आहे. तसेच गेल्या वेळीही महाविकास आघाडी सरकारने ( Mhavikak Aghadi ) भारतीय जनता पार्टीच्या बारा आमदारांचे निलंबित केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर देशभरात महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली . त्यामुळे यावेळी उपाध्यक्षांनी शिवसेनेची आमदारांचे सदस्यत्व रद्द करू नये असं मत अपक्ष आमदार महेश बांधणी यांनी व्यक्त केल आहे. विधान भवन परिसरात ते प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.


शिवसेनेकडून सदस्यत्व रद्द करण्याची मागणी - तर शिवसेनेकडून बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 12 आमदारांचे सदस्यत्व रद्द व्हावे अशू मागणी करण्यात आली आहे. त्या आशयाचे पत्र शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र दिले आहे. विधानसभा विधिमंडळाच्या बैठकीस गैरहजर राहिल्यामुळे त्यांचे हे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आपल्या पत्रातून शिवसेनेने केली होती. त्यावर शिवसेनेकडून घेतलेल्या भूमिकेवर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत त्यांचीही प्रतिक्रीया दिली आहे. अशा कारवायांना आपण घाबरत नसल्याचे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.

हेही वाचा - Narhari Zirwal Not Reachable :...अन् आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ झाले नॉट रिचेबल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.