ETV Bharat / city

Narhari Zirwal Not Reachable :...अन् आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ झाले नॉट रिचेबल

author img

By

Published : Jun 24, 2022, 3:00 PM IST

राजकीय घडामोडींमध्ये झिरवाळ यांना अतिशय महत्त्व आले आहे. विरोधकांकडून आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकडून केल्या जाणाऱ्या कारवाया रोखण्यासाठी अथवा त्यांना विलंब लावण्यासाठी झिरवाळ ( Narhari Zirwal Not Reachable ) यांना अचानक नॉट रिचेबल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Narhari Zirwal Not Reachable
Narhari Zirwal Not Reachable

मुंबई - विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे काल ( गुरुवारी ) रात्रीपासून नॉट रिचेबल ( Narhari Zirwal Not Reachable ) झाले आहेत. त्यांनी आपले संरक्षण सोडले असून आपण अज्ञातस्थळी जात असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेचे अनेक आमदार आणि मंत्री हे सुद्धा संरक्षण सोडून परराज्यात गेले. परराज्यात जाण्यापूर्वी या आमदारांनी आपले संरक्षण मुंबईतच सोडले आणि ते अज्ञात स्थळी गेले. झिरवाळ नॉट रिचेबल झाल्याने पुन्हा राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे.



पोलिसांवर कारवाई नाही : आमदारांना आणि मंत्र्यांना पोलीस विभागाने संरक्षण पुरवले आहे. आमदारांनी आणि मंत्र्यांनी आपले संरक्षण सोडल्यानंतर अशा पोलिसांवर कारवाई केली जाईल, अशी चर्चा होती. मात्र पोलिसांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. कारण संरक्षण तेव्हा नाकारायचे हा त्या मंत्र्यांना अथवा आमदारांना अधिकार असतो. त्यांनी संरक्षण नको म्हटल्यानंतर संबंधित संरक्षक पोलीस तसे पोलीस विभागाला कळवतो. त्यामुळे पोलिसांवर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही, अशी माहिती पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

झिरवाळ का झाले नॉट रिचेबल? : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व अधिकार नरहरी झिरवाळ यांच्याकडे सुपूर्द झाले आहेत. त्यामुळे सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये झिरवाळ यांना अतिशय महत्त्व आले आहे. विरोधकांकडून आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकडून केल्या जाणाऱ्या कारवाया रोखण्यासाठी अथवा त्यांना विलंब लावण्यासाठी झिरवाळ यांना अचानक नॉट रिचेबल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. झिरवाळ यांच्यापर्यंत जर शिंदे गट अथवा विरोधकांना संपर्क करता आला नाही तर हा सत्तेचा तिढा काही काळ तसाच राहू शकतो, यासाठीच हे प्रयत्न असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.


नरहरी झिरवाळ यांनीही सोडले संरक्षण : राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे सध्या सर्व राजकीय घडामोडीसाठी महत्वाची व्यक्ती ठरू लागले होते. नवीन गटनेते पदाची अथवा प्रतोद याची नेमणूक करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. मात्र या सर्व घडामोडीत झिरवाळ यांनी गुरूवारी रात्री अचानक आपले संरक्षण सोडले आणि ते सुद्धा अज्ञात स्थळी गेले आहेत.

हेही वाचा - Shivsena Big Action : शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांना केला अर्ज, 'या' 16 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची केली मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.