ETV Bharat / city

Sanjay Raut In Arthur Road Jail: शिवसेनेच्या नेत्यांना संजय राऊतांना भेटण्यास जेल प्रशासनाचा नकार

author img

By

Published : Aug 10, 2022, 4:19 PM IST

मुंबई मध्यवर्ती कारागृह
मुंबई मध्यवर्ती कारागृह

गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर संजय राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड जेलमध्ये आहे. शिवसेनेचे एक खासदार आणि दोन आमदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी जेलमध्ये गेले होते. दरम्यान, जेल प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली नाही. संजय राऊत यांना केवळ त्यांच्या परिवारातील व्यक्ती भेटू शकतात जर भेटायचे असल्यास कोर्टाची परवानगी आणावी लागेल, असे जेल प्रशासनाकडून सांगण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे.

मुंबई - शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. सध्या ते संजय राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड जेलमध्ये आहे. ( Sanjay Raut In Arthur Road Jail ) शिवसेनेचे खासदार यांच्यासह दोन आमदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी आर्थररोड जेलयेथे गेले असता त्यांना भेटण्यास कारागृह प्रशासनाने भेट नाकारली आहे. मात्र, शिवसेनेकडून हे तीन नेते कोण आहेत या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकली नाही.

संजय राऊत यांच्या वकिलांच्या मागण्या मान्य - तुरुंग नियमावलीनुसार केवळ रक्ताच्या नात्यातील कुटुंबीयच त्यांना भेटू शकतात. त्यामुळे त्यांचा भाऊ आणि कुटुंबातील सदस्यांना त्यांना भेटण्याची परवानगी दिली आहे. ( Shiv Sena Leaders Going To Meet Sanjay Raut Were Stopped ) दरम्यान, गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडीत औषधं देण्याची परवानगी द्यावी आणि घरातील जेवण देण्याची मागणी करण्यात आली. राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याने ही परवानगी द्यावी ही विनंती वकिलांनी केली आहे. आर्थर रोड कारागृह अधीक्षकांना सूचना द्यावी अशी विनंती करण्यात आली होती. न्यायालयाने संजय राऊत यांच्या वकिलांच्या मागण्या मान्य केल्या आहेत.

संजय राऊत यांच्यावर ईडीने कोणते आरोप केले? संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीने केला. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना (HDIL)ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचे नाव सुरुवातीला समोर आले होते आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे नावालाच होते. या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला. संजय राऊत हेच प्रवीण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते असे ईडीने न्यायालयात सांगितले. मग पत्राचाळ गैरव्यवहारातील पैसे असो की दादर येथील घर आणि अलिबाग येथील जमीन सर्व व्यवहार संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आले. येस बँक घोटाळा प्रकरणी वाधवान बंधू यांच्यासोबत प्रवीण राऊत यांचे नाव आले असून या प्रकरणीही संजय राऊत यांची भविष्यात ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काय आहे पत्राचाळ घोटाळा? - मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा म्हाडा भूखंड आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. पत्राचाळमध्ये राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली. तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. ही चाळ विकसित करण्याचे कत्रांट महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन 3 हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती. हे फ्लॅट 47 एकर जागेवर बांधले जाणार होते. मात्र, गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने तसे केले नाही. कंपनीने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा एमएचडीएला फ्लॅटही दिला नाही. कंपनीने ही जमीन अन्य आठ बिल्डरांना 1,034 कोटी रुपयांना विकली. हे दोन्ही घोटाळे करणाऱ्या एचडीआयएलचे संचालक प्रवीण राऊत, सारंग वाधवान, राकेश वाधवन आहेत.

अलिबागमध्ये जमीन खरेदी केली - ईडीने प्रवीणला पकडले तेव्हा संजय राऊतचे नाव समोर आले. प्रवीण हा शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मित्र आहे. प्रवीणच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 83 लाखांचे कर्जही दिले होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. तपास सुरू झाल्यावर वर्षा यांनी प्रवीणच्या पत्नीला 55 लाख रुपये परत केले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी सुजित पाटकर याचाही संजय राऊतशी संबंध आहे. सुजित हा संजय यांच्या मुलीच्या फर्ममध्ये भागीदार आहे. सुजितची पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने मिळून अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. ही जमीनही घोटाळ्याच्या पैशातून घेण्यात आली होती.

हेही वाचा - डॉ. पी वरवरा राव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर; वाचा, कोण आहेत वरवरा राव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.