ETV Bharat / city

Sanjay Raut on Kirit Somaiya : तो माथेफिरू हनुवटीवर टोमॅटो सॉस लावून येतो आणि.. संजय राऊतांचा सोमैयांना टोला

author img

By

Published : Apr 26, 2022, 1:13 PM IST

Updated : Apr 26, 2022, 2:22 PM IST

तो वेडा माथेफिरू हनुवटीवर सॉस लावून येतो ( Sanjay Raut tomato sauce comment ) आणि राष्ट्रपती राजवट लावा, असे म्हणतो. अशा मूर्खाकडे दुर्लक्ष केले पाहिजे. त्यांच्या ओठावरची जखम एका दिवसांत गायब पण होते? हे सगळे ढोंग आहे, अशी टीका संजय राऊत ( Sanjay Raut on kirit Somaiya ) यांनी किरीट सोमैयांवर केली.

Sanjay Raut tomato sauce comment
किरीट सोमैया टीका संजय राऊत मुंबई

मुंबई - तो वेडा माथेफिरू हनुवटीवर सॉस लावून येतो ( Sanjay Raut tomato sauce comment ) आणि राष्ट्रपती राजवट लावा, असे म्हणतो. अशा मूर्खाकडे दुर्लक्ष केले पाहिजे. त्यांच्या ओठावरची जखम एका दिवसांत गायब पण होते? त्याची कोणती निशाणी राहत नाही. हे सगळे ढोंग आहे, अशा शब्दात संजय राऊत ( Sanjay Raut on kirit Somaiya ) यांनी किरीट सोमैया यांचा समाचार घेतला आहे. ते मुंबईत आपल्या ( Sanjay Raut news on kirit Somaiya in mumbai ) निवासस्थानी बोलत होते.

प्रतिक्रिया देताना भाजप नेते किरीट सोमैया आणि शिवसेना नेते संजय राऊत

हेही वाचा - Mumbai Railway Incident CCTV Video : देव तारी त्याला कोण मारी; आरपीएफ जवानाने वाचविले प्रवाशांचे प्राण

राज्यात किरीट सोमैया विरुद्ध संजय राऊत ( Sanjay Raut on President Rule ) हा वाद दिवसेंदिवस टोकाला पोहचत चालला आहे. शनिवारी किरीट सोमैया खार पोलिसांच्या अटकेत असलेल्या नवनीत राणा व रवी राणा या दाम्पत्याची भेट घेण्यासाठी खार येथे पोहचले. यावेळी त्यांच्यावरती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याप्रकरणी किरीट सोमैया यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री व केंद्रीय गृहसचिव यांची भेट घेत संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली. यावर आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून, सोमय्या यांच्यावर शेलक्या शब्दात सदर टीका केली आहे.

महाराष्ट्रातील भाजपचे लोक लोकशाही विषयी प्रवचन झाडत आहेत. ही एक आनंदाची बातमी आहे. देवेंद्र फडणवीस यांना लोकशाही आठवते ते आता लोकशाहीची चर्चा करतात. ही महाराष्ट्रासाठी आणि एकूणच लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, सगळ्या राज्यातील विरोधकांवर दबाव इतके सगळे करत असताना महाराष्ट्रात त्यांना लोकशाहीची आठवण येते, ही एक चांगली बाबत म्हणावी लागेल, असे देखील संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा - Power Cut In Mumbai : मुंबईत अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक विभागात बत्ती गुल

Last Updated : Apr 26, 2022, 2:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.