ETV Bharat / city

महाराष्ट्रातील गुंतवणूक उत्तर प्रदेशात नेण्याचा भाजपाचा कुटील डाव - सचिन सावंत

author img

By

Published : Dec 1, 2020, 10:57 AM IST

योगी आदित्यनाथ हे उद्यापासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यांवर असणार आहेत. ते महाराष्ट्राचे उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांची भेट घेणार आहेत. उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांना धमकावण्याचा प्रयत्न यातून केला जाऊ शकतो. त्यांचा हा कुटील डाव वेळीच ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने राज्यातील उद्योजक तसेच बॉलिवूडच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.

sachin sawant
महाराष्ट्रातील गुंतवणूक उत्तर प्रदेशात नेण्याचा भाजपाचा कुटील डाव - सचिन सावंत

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजयकुमार बिश्त (योगी आदित्यनाथ) हे मुंबईत येऊन महाराष्ट्राच्या उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक नेण्याचा त्यांचा डाव आहे. उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांना धमकावण्याचा प्रयत्न यातून केला जाऊ शकतो. त्यांचा हा कुटील डाव वेळीच ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने राज्यातील उद्योजक तसेच बॉलिवूडच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील गुंतवणूक उत्तर प्रदेशात नेण्याचा भाजपाचा कुटील डाव - सचिन सावंत

महाराष्ट्राला बदनाम करण्यात योगींचा हात..

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील उद्योजक, बॉलिवूड यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे षड्यंत्र मागील काही महिन्यापासून केले जात असल्याचे उघड झाले आहे. एनसीबीच्या माध्यमातून बॉलिवूडला बदनाम करण्याचे प्रयत्न सुशांतसिंग प्रकरणापासून कसे केले जात आहेत हेही स्पष्ट झाले आहे. मोदी सरकारच्या मदतीने महाराष्ट्राला बदनाम करण्याच्या मोहिमेत अजकुमार बिष्ट यांचाही पुढाकार राहिलेला आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न २०१४ पासूनच होतो आहे.

गुजरातनंतर आता महाराष्ट्रावर नजर..

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र असेच षड्यंत्र करुन गुजरातला नेले गेले. आता बॉलिवूडचे महत्व कमी करुन उत्तर प्रदेशमध्ये दुसरा चित्रपट उद्योग निर्माण करण्याचा डाव आहे. त्यांच्या मुंबई भेटीत ते अशीच भीती दाखवून महाराष्ट्रातील गुंतवणूक व बॉलिवूड उत्तर प्रदेशला नेण्यासाठी घाट घालतील. महाराष्ट्राची अधोगती करण्याचा त्यांचा कुहेतू लक्षात घेऊन मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच महाविकास आघाडी सरकारने उद्योगपती व बॉलिवूडच्या पाठीशी खंबरपणे उभे राहण्याची गरज आहे.

उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे..

अजयकुमार बिश्त यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेशात कायदा सुव्यव्यस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत. दलित, महिला, अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार वाढल्याचे देशाने पाहिले आहेत. दिवसाढवळ्या बलात्कार होत आहेत. सामाजिक एकोपा राहिलेला नसून उत्तरप्रदेश हे उत्तम प्रदेश नसून जंगलराज झाले आहे. बिश्त यांच्यामुळे विद्वेषाचे वातावरण उत्तर प्रदेशमध्ये निर्माण झाले आहे. आता केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रातील वातावरण दूषीत करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, असेही सावंत म्हणाले. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील उद्योजकांमध्ये षड्यंत्राने दहशत निर्माण करण्याऐवजी स्वतःच्या राज्यात उद्योगांकरिता अनुकूल वातावरण तयार करावे, असा सल्लाही सावंत यांनी दिला.

हेही वाचा : बॉलिवूडला साद घालण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत येणार; उद्योजकांशीही करणार चर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.