ETV Bharat / city

'डी गॅंग' पुन्हा सक्रिय? दिल्ली आणि मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्यता

author img

By

Published : May 11, 2022, 12:06 PM IST

Updated : May 11, 2022, 1:17 PM IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम

राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए कडून सोमवारपासून मुंबई-ठाणे परिसरात छापेमारी केली होती. या छापेमारी दरम्यान एनआयएला काही महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक तसेच कागदपत्र सापडले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने एनआयए म्हटले आहे की नवी दिल्ली, मुंबई आणि इतर प्रमुख शहरांसह देशातील विविध भागांमध्ये हिंसाचार भडकवण्यासाठी दहशतवादी निधीची चौकशी करत आहे.

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा भारतात आतंकवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए कडून सोमवारपासून मुंबई-ठाणे परिसरात छापेमारी केली होती. या छापेमारी दरम्यान एनआयएला काही महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक तसेच कागदपत्र सापडले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने एनआयए म्हटले आहे की नवी दिल्ली, मुंबई आणि इतर प्रमुख शहरांसह देशातील विविध भागांमध्ये हिंसाचार भडकवण्यासाठी दहशतवादी निधीची चौकशी करत आहे. एनआयएने सोमवारी मुंबई आणि मीरा रोड परिसरात दाऊद इब्राहिम टोळीशी संबंध असल्याच्या अनेक ठिकाणी छापेमारी केली.

भाइंदर परिसरामध्ये 5 ठिकाणी छापेमारी - कासकरच्या कोठडीची मागणी करताना, एनआयएने मुंबईतील एका विशेष न्यायालयात सांगितले की, डी-कंपनीने स्फोटके आणि प्राणघातक शस्त्रे वापरून राजकारणी, व्यापारी आणि इतरांसह प्रतिष्ठित व्यक्तींवर हल्ला करण्यासाठी एक विशेष युनिट स्थापन केली होती. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, मुंबई आणि इतर प्रमुख शहरांसह भारताच्या विविध भागांमध्ये हिंसाचार घडवून आणू शकतील अशा घटना भडकवण्याची योजना आखत असल्याचेही यात म्हटले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संबंधित व्यक्तींविरोधात आज एनआयएने मुंबईत 24 तर मिरा भाइंदर परिसरामध्ये 5 ठिकाणी छापेमारी केली आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात 29 ठिकाणी एनआयएने छापेमारी केली आहे. या प्रकरणात एनआयएने 3 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम साथीदार छोटा शकील , जावेद चिकना , टायगर मेनन , इक्बाल मिर्ची , दाऊदची बहीण हसीना पारकर यांच्याशी संबंधित व्यक्ती आणि नातेवाईक यांचा समावेश आहे.

शस्त्रास्त्र जप्त - एनआयएने ज्या प्रकरणात छापेमारी केली ते हाजी अनीस म्हणजे अनीस इब्राहिम शेख, शकील शेख उर्फ छोटा शकील, जावेद पटेल उर्फ जावेद चिकना आणि इब्राहिम मुश्ताक अब्दुल रज्जाक मेमन उर्भ दाऊद इब्राहिम कासकर आणि त्याच्या साथीदारांचा समावेश असलेल्या डी कंपनीच्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी कारवायांशी संबंधित असल्याची माहिती एएनआयकडून देण्यात आली. तसेच दाऊदच्या संशयित साथिदारांकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे, रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीची कागदपत्रे, रोख रक्कम आणि शस्त्रास्त्र जप्त करण्यात आल्याची माहितीही एनआयएने दिली आहे. रियल इस्टेट तसेच अन्य माध्यमातून जमा झालेला पैसा हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना लष्कर-ए-तयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल् कायदा या सारख्या दहशतवादी संघटनांना पुरवल्या जात असल्याचा दावा देखील NIAने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तसेच आज छापा टाकण्यात आलेली सर्व ठिकाण ही दशवतवादी दाऊद इब्राहिमच्या हस्तकांची असल्याचंही NIA ने सांगितलं आहे.

हेही वाचा - Murder Youth In Bhilwara: भीलवाडामध्ये तणाव! प्रशासनाकडून 24 तास इंटरनेट सेवा बंद

इकबाल कासकरचा ताबा घेण्याची शक्यता - एनआयए कडून मुंबईत सोमवारी केलेल्या छापेमारी मध्ये अनेक महत्त्वाचे माहिती समोर आल्यानंतर आता एनआयए इकबाल कासकरचा ताबा घेण्याचे तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यासंदर्भात एनआयए अधिकाऱ्यांकडून मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टामध्ये अर्ज देखील करणार आहे. एनआयए कडून अर्ज केल्यानंतर न्यायालय इक्बाल कासकर याचा ताबा परवानगी मिळाल्यानंतर एनआयए अधिकार भिवंडी न्यायालयातून इक्बाल कासकर याचा ताबा घेण्याकरिता हे अर्ज करणार आहे. त्यानंतर एनआयए ठाण्यातील कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात हजर करण्यात येईल त्यानंतर एनआयए कोठडी मागण्याची शक्यता आहे.

Last Updated :May 11, 2022, 1:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.