ETV Bharat / bharat

Murder Youth In Bhilwara: भीलवाडामध्ये तणाव! प्रशासनाकडून 24 तास इंटरनेट सेवा बंद

author img

By

Published : May 11, 2022, 10:42 AM IST

भीलवाडामध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. परिस्थितीची संवेदनशीलता पाहता स्थानिक प्रशासनानेही आज इंटरनेट सेवा बंद केली आहे. याच्या निषेधार्थ लोकांनी आज भिलवाडा बंदची घोषणा केली आहे.

Murder Youth In Bhilwara
Murder Youth In Bhilwara

भीलवाडा - नुकतेच दोन तरुणांना मारहाण करून दुचाकी जाळल्याची घटना घडल्याने (Tension In Bhilwara) शहरात तणावाचे वातावरण होते. पुन्हा एकदा अशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा चाकूने वार करून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ( Communal Tension In Bhilwara ) प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

त्याचवेळी आज काही संघटनांनी भिलवाडा बंदची घोषणा केली आहे. बुधवार 11 मे रोजी सकाळी 6.00 ते गुरुवार 12 मे रोजी सकाळी 6:00 वाजेपर्यंत भिलवाडा शहरातील नेट 24 तास बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. तरुणाच्या हत्येची माहिती मिळताच सर्व संघटनांचे नेते जिल्हा रुग्णालयात जमा झाले. यामध्ये भिलवाडा शहराचे आमदार विठ्ठल शंकर अवस्थी, भाजपचे जिल्हाध्यक्ष लाडू लाल तेली, नगर परिषदेचे अध्यक्ष राकेश पाठक यांचा समावेश होता.

भिलवाडा येथील तणावाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाचही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एसटीएफ आणि आरएसीचे जवान तैनात करण्यात आले होते. मृत तरुणाचे मामा महेश खोतानी यांनी न्यायाची मागणी करत सर्व हल्लेखोरांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याचे सांगितले. विविध संघटनांनीही या हत्येचा निषेध करत जिल्हा प्रशासनाला जबाबदार धरले आहे.

भाजपने या घटनेचा निषेध करणारे निवेदन सादर केले असून हल्लेखोरांना अटक करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत कुटुंबीयांच्या मागणीनुसार 50 लाखांची नुकसान भरपाई दिली जात नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, भिलवाडा बंद ठेवणार असल्याचे त्यांनी त्यामध्ये लिहिले आहे.

मंगळवारी (10 मे 2022) रात्री शास्त्रीनगर भागातील ब्राह्मणी स्वीट्सजवळ काही लोकांनी आदर्श तापडिया नावाच्या तरुणावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. जखमी तरुणाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. मृताचे वडील ओमप्रकाश तापडिया हे भिलवाडा येथील इतिहासलेखक होते ज्यांचे निधन झाले आहे.

जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भीलवाडा येथे हिंसाचाराची घटना घडली होती. येथील सांगानेर परिसरात एका समाजातील दोन गटात वाद झाल्याने परिस्थिती चिघळली होती. ज्यामध्ये मारामारीत दुचाकी पेटवण्यात आली. परिस्थिती बिघडलेली पाहून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. या घटनेत जखमी झालेल्या दोन तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोरांचा उत्साहाने शोध घेत असताना अनेकांना अटक केली.


हेही वाचा - क्रुर बाप! पोटच्या मुलीवर वारंवार बलात्कार; कोर्टाकडून 106 वर्षाची सजा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.