ETV Bharat / city

Rajya Sabha Election 2022 : ...म्हणून पक्षांना वाटतेय धास्ती

author img

By

Published : Jun 8, 2022, 9:03 AM IST

Updated : Jun 8, 2022, 2:07 PM IST

राज्यसभा निवडणुकांच्या ( Rajya Sabha Election 2022 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे धाबे दणाणले आहेत. विशेषतः महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष अधिक अस्वस्थ झाल्याचे दिसते आहे. याचे कारण म्हणजे पक्षांकडे असलेले अपुरे संख्याबळ आणि त्यामुळे आमदारांवरही न करता येणारी कारवाई हे महत्त्वाचे कारण असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केल्या आहेत.

म्हणून पक्षांना वाटतेय धास्ती
म्हणून पक्षांना वाटतेय धास्ती

मुंबई - राज्यसभा निवडणुकीच्या ( Rajya Sabha Election 2022 ) पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी होत आहेत. फारसे महत्त्व नसलेले अपक्ष अचानक चलतीत आले आहेत. पक्षातील आमदारांनी शेवटच्या क्षणी धोका देऊ नये, यासाठी राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांना सुरक्षितस्थळी एक प्रकारे स्थानबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही आजमीतिला सत्ताधारी पक्षातील कोणत्याही घटक पक्षाकडे आमदारांवर शिस्तभंगाची अथवा निलंबनाची कारवाई करावी एवढी क्षमता नाही याचाच फायदा आमदार घेतील, अशी भीती या सर्व पक्षांना वाटत आहे, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

बोलताना राजकीय विश्लेषक

आमदार फुटण्याची भीती - राज्यसभेची सहावी जागा सत्ताधारी आणि विरोधक यांनी प्रतिष्ठेची केली आहे. या जागेसंदर्भात राज्यात असलेल्या महाविकासआघाडी घटक पक्षातील आमदारांना संबंधित पक्षांनी एकत्र जमवून हॉटेलमध्ये निवडणुकीपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक राज्यसभेसाठी अशा पद्धतीने पहिल्यांदाच लॉबिंग होत आहे. आपल्या पक्षाच्या आमदारांना फोडण्याची भीती ही राजकीय पक्षांमध्ये असल्यामुळेच हा प्रकार घडत असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक चंदन शिरवाळे यांनी व्यक्त केली आहे. या निवडणुकीत मतदान दाखवून करण्यात येणार असल्याने व्हीप लागू करण्याची गरज भासणार नाही. मात्र, अपक्ष आमदार या निवडणुकीत अत्यंत निर्णायक भूमिका बजावणार आहेत.

कामे करून घेण्याची अपक्ष आमदारांना संधी - या निवडणुकीत राजकीय पक्षातर्फे व्हिप जारी करण्यात येण्याची शक्यता असली तरी राजकीय पक्षातील आमदार फार फुटण्याचा धोका नाही. तरीही आमदार पसंतीक्रमाच्या मतदानामध्ये काही गडबड करू शकतात अशा आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. मात्र, सध्याची राजकीय पक्षांची स्थिती आणि ताकद पाहता आमदारांना पक्षातून निलंबित करण्याचा धोका कुणीही पत्करणार नाही. त्यामुळे कदाचित क्रॉस शूटिंग होऊ शकते, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केले. तसेच अपक्ष आमदारांना ही संधी चालून आली आहे की त्यांच्या मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प आणि विकास कामांसाठी सरकारकडून थेट आश्वासन घेऊनच मतदान करणे. त्यामुळे एकूणच सध्या अपक्ष आमदारांना चांगले दिवस आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये, असेही भावसार म्हणाले.

हेही वाचा - Rajya Sabha Election 2022 : घोडेबाजार शब्दांमुळे प्रतिमा मलीन, अपक्ष आमदारांची खंत

Last Updated :Jun 8, 2022, 2:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.