ETV Bharat / city

Police Playing Flute Mumbai :...अन् खाकीतील सुप्त कलाकाराने बासरीच्या सुरांनी केले मंत्रमुग्ध, एकदा ऐकाच...!

author img

By

Published : May 8, 2022, 7:34 PM IST

Updated : May 8, 2022, 8:20 PM IST

27 मार्च पासून सुरु केलेल्या संकल्पनेनंतर या संकल्पनेला मुंबईकरांनी ( Mumbai Sunday Street ) चांगला प्रतिसाद दिला होता. आज (रविवारी) मुंबईतील रफी अहमद किडवई मार्ग ( Rafi Ahmed Kidwai Marg ) पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब कुळे ( Police Sub-Inspector Dadasaheb Kule playing flute ) यांनी बासरीचे सुरेल वादन केले.

Police Playing Flute Mumbai
Police Playing Flute Mumbai

मुंबई - मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या संकल्पनेतून मुंबईकरांना रविवारच्या दिवशी फिरण्यासाठी आणि सायकल इन स्केटिंग क्रिकेट खेळण्यासाठी संडे स्ट्रीट ही संकल्पना सुरू केली होती. 27 मार्च पासून सुरु केलेल्या संकल्पनेनंतर या संकल्पनेला मुंबईकरांनी ( Mumbai Sunday Street ) चांगला प्रतिसाद दिला होता. आज (रविवारी) मुंबईतील रफी अहमद किडवई मार्ग ( Rafi Ahmed Kidwai Marg ) पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब कुळे ( Police Sub-Inspector Dadasaheb Kule playing flute ) यांनी बासरीचे सुरेल वादन केले. दादासाहेब कुळे यांच्या आत लपलेले कलाकार बाहेर आले आणि त्यांनी बासरीच्या तालावर बॉर्डरचे गाणे वाजवून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

बासरी वादन करताना पोलीस अधिकारी


मुंबई पोलिसांकडून दर रविवारी संडे स्ट्रीट कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज मुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्याच्या आतील कलाकार बाहेर आला. यानंतर त्यांनी जे केले त्यामुळे सर्वच जण मंत्रमुग्ध झाले. दादासाहेब कुळे असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते रफी अहमद किडवई मार्ग पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर सेवेत आहेत. संडे स्ट्रीट या कार्यक्रमाच्या माध्यमातून दादासाहेब कुळे यांच्या आत लपलेला कलाकार बाहेर आला आणि त्याने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.


काय आहे संडे स्ट्रीड? : आयुक्त संजय पांडे यांच्या संकल्पनेतून 27 मार्चपासून मुंबईकरांसाठी संडेस्ट्रीट सुरू करण्यात आले आहे. मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या पुढाकाराने मुंबईत सहा ठिकाणी हे सँडेस्ट्रीट सुरू करण्यात आले आहेत. मुंबईकरांना रस्त्यावर येवून मनोरंजन, योगा, स्केटिंग, सायकलींग तसेच सांस्कृतिक खेळ यासारखे कार्यक्रम करता यावेत, यासाठी संडेस्ट्रीट ही संकल्पना राबविण्यात येत आहे. प्रत्येक रविवारी सकाळी 6 ते 10 वेळेत रस्ते वाहतुकीसाठी बंद करुन ते नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. संजय पांडे यांनी मरीन ड्राइव्ह या ठिकाणी या संडेस्ट्रीटमध्ये सहभाग घेतला होता. मरीन ड्राइव्ह परिसरात मोठ्या प्रमाणत मुंबईच्या विविध भागातून नागरिक दाखल झाले होते. कोणी या मोकळ्या रस्त्यावर बॅडमिंटन खेळत होते, कोणी सायकलींग करीत होते, तर कोणी स्केटिंग आणि योगा करीत होते. या संकल्पनेचे मुंबईकरांनी जल्लोषात स्वागत केले. त्याचबरोबर मुंबईच्या विविध भागात ही संडेस्ट्रीट तयार करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा - Natural jaggery Nashik : द्राक्ष नगरीत आता नैसर्गिक गुळाचा गोडवा; शेतकऱ्यांचा सहकार उद्योग ठरला यशस्वी

Last Updated :May 8, 2022, 8:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.