ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत आज १५५ नवे रुग्ण, शून्य मृत्यूची नोंद

author img

By

Published : Oct 4, 2022, 9:17 PM IST

Mumbai Corona
Mumbai Corona

मुंबईत आज ४ ऑक्टोबरला ४३८७ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १५५ रुग्णांची नोंद झाली. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ५० हजार ७०१ रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबई - मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार कमी झाला आहे. काल ६६ रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यात दुपटीहून अधिक वाढ होऊन १५५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या ७८४ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

कोरोनाचे १५५ नवे रुग्ण - मुंबईत आज ४ ऑक्टोबरला ४३८७ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १५५ रुग्णांची नोंद झाली. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ५० हजार ७०१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३० हजार १८४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७८४ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ९०४५ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००८ टक्के इतका आहे.


रुग्णसंख्या घटतेय -मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. १८ ऑगस्टला १२०१ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊ लागली आहे. १ सप्टेंबरला २७२, २ सप्टेंबरला ४०२, ३ सप्टेंबरला ३९४, ४ सप्टेंबरला ३७६, ५ सप्टेंबरला १७३, ६ सप्टेंबरला २८५, ७ सप्टेंबरला ३१६, २२ सप्टेंबरला ९८, २३ सप्टेंबरला १०६, २४ सप्टेंबरला १२२, २५ सप्टेंबरला १०८, २६ सप्टेंबरला ५१, २७ सप्टेंबरला ८५, २८ सप्टेंबरला ११६, २९ सप्टेंबरला १००, ३० सप्टेंबरला ११५, १ ऑक्टोबरला १३०, २ ऑक्टोबरला १०२, ३ ऑक्टोबरला ६६, ४ ऑक्टोबरला १५५ रुग्णांची नोंद झाली आहे.


१३२ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १३२ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा, ऑगस्ट महिन्यात ७ वेळा, सप्टेंबर महिन्यात १३ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.