ETV Bharat / city

Corona Update : राज्यात ६२५८ नवीन रुग्णांची वाढ, २५४ मृत्यू

author img

By

Published : Jul 27, 2021, 11:54 PM IST

राज्यात मंगळवारी १२,६४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,५८,७५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

Corona Update
Corona Update

मुंबई - राज्यात आलेली कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे गेले काही दिवस राज्यातील कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत घट दिसून येत आहे. रविवारी १८ जुलैला ९ हजार रुग्ण आढळून आले होते. त्यात घट होऊन शुक्रवारी ६७५३, शनिवारी ६२६९, रविवारी ६८४३ तर सोमवारी ४,८७७ रुग्णांची नोंद झाली होती. त्यात मंगळवारी वाढ होऊन ६२५८ रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी ५३ मृत्यूची नोंद झाली होती. त्यात वाढ होऊन मंगळवारी २५४ मृत्यूंची नोंद झाली आहे. मंगळवारी १२ हजार ६४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

१२,६४५ रुग्णांना डिस्चार्ज -

राज्यात मंगळवारी १२,६४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,५८,७५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५४ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ६,२५८ नवीन रुग्णाांचे निदान झाले असून २५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३१,८५९ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,७१,७६,७१५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,७६,०५७ (१३.३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,९८,९३३ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ८२,०८२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृत्यू दर वाढला -

१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३ मृत्यूंची नोंद झाली होती. त्यात आज वाढ होऊन २५४ मृत्यूंची नोंद झाली आहे.

राज्यात मृत्युदर २.०९ टक्के इतका नोंदवण्यात आला होता. त्यात किंचित वाढ होऊन आज मृत्युदर २.१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई - ३४४
रायगड - २०३
अहमदनगर - ६५४
पुणे - ५४९
पुणे पालिका - २२२
पिपरी चिंचवड पालिका - १९०
सोलापूर - ५४१
सातारा - ८४४
कोल्हापूर - २६७
कोल्हापूर पालिका - १७५
सांगली - ६३१
सिंधुदुर्ग - १२८
रत्नागिरी - २७७
बीड - १९९

जुलैमध्ये आतापर्यंतची दैनंदिन रुग्णसंख्या -

27 जुलै - 6258 नवे रुग्ण
26 जुलै - 4877 नवे रुग्ण
25 जुलै - 6843 नवे रुग्ण
24 जुलै - 6269 नवे रुग्ण
23 जुलै - 6753 नवे रुग्ण
22 जुलै - 6753 नवे रुग्ण
22 जुलै - 7302 नवे रुग्ण
21 जुलै - 8159 नवे रुग्ण
20 जुलै - 6910 नवे रुग्ण
19 जुलै - 6017 नवे रुग्ण
18 जुलै - 9000 नवे रुग्ण
17 जुलै - 8172 नवे रुग्ण
16 जुलै - 7761 नवे रुग्ण
15 जुलै - 8010 नवे रुग्ण
14 जुलै - 8602 नवे रुग्ण
13 जुलै - 7243 नवे रुग्ण
12 जुलै - 7603 नवे रुग्ण
11 जुलै - 8535 नवे रुग्ण
10 जुलै - 8296 नवे रुग्ण
9 जुलै - 8992 नवे रुग्ण
7 जुलै - 9558 नवे रुग्ण
5 जुलै - 6740 नवे रुग्ण
4 जुलै - 9336 नवे रुग्ण
3 जुलै - 9489 नवे रुग्ण
2 जुलै - 8753 नवे रुग्ण
1 जुलै - 9195 नवे रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.