ETV Bharat / city

भीमा कोरेगाव प्रकरण : तीन आरोपींच्या अर्जावर एनआयएला उत्तर देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

author img

By

Published : Feb 9, 2022, 8:46 PM IST

मुंबई उच्च न्यायालय
मुंबई उच्च न्यायालय

2018 च्या भीमा कोरेगाव प्रकरणातील तीन आरोपींनी त्यांना डिफॉल्ट जामीन नाकारत 1 डिसेंबर 2021 रोजी दिलेल्या निकालाचे पुनरावलोकन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात आज धाव घेतली आहे. भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणातील वरावरा राव, अरुण फरेरा आणि व्हर्नन गोन्साल्विस या तीन आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये डिफॉल्ट जामीन नाकारलेल्या अर्जावरील पुनर्विलोकन करण्यात यावे याकरिता अर्ज दाखल केला आहे. यावर NIA ला दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मुंबई - भीमा कोरेगाव एल्गार परिषद ( Bhima Koregaon Case ) प्रकरणातील तीन आरोपींच्या जामिन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाने आज सुनावणी घेतली आहे. आरोपींना जामीन आणि त्यांना डिफॉल्ट जामीन नाकारण्याच्या आदेशात तथ्यात्मक सुधारणा करण्यासाठी दाखल केलेल्या पुनर्विलोकन अर्जावर दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला ( Mumbai High Court directs NIA ) दिले आहेत.

2018 च्या भीमा कोरेगाव प्रकरणातील तीन आरोपींनी त्यांना डिफॉल्ट जामीन नाकारत 1 डिसेंबर 2021 रोजी दिलेल्या निकालाचे पुनरावलोकन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात आज धाव घेतली आहे. भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणातील वरावरा राव, अरुण फरेरा आणि व्हर्नन गोन्साल्विस या तीन आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये डिफॉल्ट जामीन नाकारलेल्या अर्जावरील पुनर्विलोकन करण्यात यावे याकरिता अर्ज दाखल केला आहे. यावर NIA ला दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

हेही वाचा-Relief to Varvara Rao : मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; वरवरा राव यांना 28 फेब्रुवारीपर्यंत आत्मसर्मपणाची मुदत
काय आहे याचिका?
याचिकाकर्ते यांनी याचिकेत असा दावा केला आहे की सध्याचा पुनर्विलोकन अर्ज निकालात काही तथ्यात्मक त्रुटींमुळे उद्भवला आहे. अॅड. आर सत्यनारायणन यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत आरोपींनी त्रुटी सुधारण्याची मागणी केली आहे. त्यांना जामीन मिळावा अशी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील द्विसदस्यीय खंडपीठाने राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए आणि महाराष्ट्र राज्याला उत्तर दाखल करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यानंतर या प्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे.

हेही वाचा-Bhima Koregaon Violence : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर हजर
वरवरा यांना 28 फेब्रुवारीपर्यंत आत्मसर्मपणाची मुदत-
भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषद माओवाद्यांशी संबंध प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात ( Accused in Bhima Koregaon violanece ) आलेले आणि सध्या वैद्कीय जामिनावर असलेले 82 वर्षीय तेलुगु कवी वरवरा राव यांना जामीन याचिकेवर दिलेला दिलासा यापूर्वीच कायम ( Mumbai high court relief to relief to Varvara Rao ) ठेवला होता. वरवरा राव यांना आत्मसमर्पण करण्याची मुदत 5 फेब्रुवारी रोजी संपणार होती. 4 फेब्रुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने वरावरा राव यांची आत्म समर्पणाची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे.
हेही वाचा-Temporary relief to Varvara Rao : ज्येष्ठ कवी वरवरा राव यांना 5 फेब्रुवारी पर्यंत तात्पुरता दिलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.