ETV Bharat / city

हुश्श... मुंबईंत गेल्या दीड वर्षातील सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद

author img

By

Published : Aug 16, 2021, 10:14 PM IST

मुंबईत सोमवारी 190 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आजवरचा आकडा 7 लाख 39 हजार 526 वर पोहोचला आहे. सोमवारी 3 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आजवरचा आकडा 15 हजार 992 वर पोहोचला आहे.

मुंबई कोरोना अपडेट
मुंबई कोरोना अपडेट

मुंबई - देशाच्या आर्थिक राजधानीत 190 रुग्णांची नोंद झाल्याने मुंबईतील कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आला आहे. गेल्या दीड वर्षातील सर्वात कमी रुग्णांची ही नोंद आहे. सोमवारी 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. त्यात गेल्या काही महिन्यात घट झाली आहे. 2 ऑगस्टला 259 तर 9 ऑगस्टला 208 रुग्णांची नोंद झाली होती.

हेही वाचा-लसीकरणाच्या मुद्यावर शर्मिला ठाकरेंची केंद्र व राज्य सरकारवर टीका, म्हणाल्या...

रुग्ण दुपटीचा कालावधी 1966 दिवसांवर -
मुंबईत सोमवारी 190 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आजवरचा आकडा 7 लाख 39 हजार 526 वर पोहोचला आहे. सोमवारी 3 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आजवरचा आकडा 15 हजार 992 वर पोहोचला आहे. सोमवारी 271 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 7 लाख 18 हजार 354 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 2 हजार 749 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 1966 दिवस इतका आहे.

हेही वाचा-पेट्रोलसह डिझेलच्या उत्पादन शुल्कात होणार नाही कपात, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिले 'हे' कारण

एकही चाळ आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन-

मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या एकही चाळ आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेल्या नाहीत. तर 21 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 26 हजार 484 तर आतापर्यंत एकूण 86 लाख 78 हजार 746 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हेही वाचा-शहाण्याला शब्दाचा मार.. पत्र गेलं आहे मात्र वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात आले नसेल, पवारांचा राज्यपालांना टोला


अशी रुग्णसंख्या झाली कमी -
4 एप्रिलला 11,163, 7 एप्रिलला 10428, 1 मे रोजी 3908, 9 मे रोजी 2403, 10 मे रोजी 1794, 17 मे रोजी 1240, 25 मे रोजी 1037, 28 मे रोजी 929 रुग्णसंख्या आढळली आहे. तर 8 जून रोजी 673, 10 जून रोजी 660, 11 जून रोजी 696, 14 जून रोजी 529, 15 जूनला 575, 16 जूनला 830, 21 जूनला 521, 22 जूनला 570 रुग्ण आढळले आहेत. तर 4 जुलैला 548, 5 जुलैला 489, 6 जुलैला 453, 13 जुलैला 441, 2 ऑगस्टला 259, 9 ऑगस्टला 208, 16 ऑगस्टला 190 नवे रुग्ण आढळून आले आहेत. या आधी 1 फेब्रुवारीला 328 तर 2 फेब्रुवारीला 334 तर 26 जुलैला 299 रुग्णांची नोंद झाली होती.

दरम्यान, कोरोनाचा देशभरात संसर्ग वाढत असताना गतवर्षी मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण होते. मात्र, हे प्रमाण वरचेवर कमी होत असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.