ETV Bharat / city

तक्रारी असल्यास माझ्या नंबरवर कळवा, मुंबई पोलीस आयुक्तांचे नागरिकांना पत्राद्वारे आवाहन

author img

By

Published : Mar 3, 2022, 10:24 PM IST

Mumbai cp Sanjay Pandey letter Mumbai people
पोलीस आयुक्त संजय पांडे पत्र मुंबई नागरिक

मुंबईचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आज मुंबईमधील नागरिकांना जर तुमच्या काही तक्रारी असेल तर, मला माझ्या खासगी नंबरवर पाठवू शकतात, असे सोशल मीडियावर पत्र टाकून आवाहन केले आहे. संजय पांडे ( Mumbai cp Sanjay Pandey letter to Mumbai people ) यांनी मोबाईल नंबर देखील शेअर केला आहे.

मुंबई - मुंबईचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आज मुंबईमधील नागरिकांना जर तुमच्या काही तक्रारी असेल तर, मला माझ्या खासगी नंबरवर पाठवू शकतात, असे सोशल मीडियावर पत्र टाकून आवाहन केले आहे. संजय पांडे ( Mumbai cp Sanjay Pandey letter to Mumbai people ) यांनी मोबाईल नंबर देखील शेअर केला आहे. पांडे हे पोलीस महासंचालक पदावर असताना देखील त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले होते. आता त्यांनी मुंबईकरांना पत्राद्वारे आवाहन केले आहे. या पत्रात ते म्हणाले आहेत की, मुंबई शहराशी आणि त्या माध्यमातून आपल्याशी माझे एक भावनिक नाते जुळलेले आहे.

हेही वाचा - Big B Visit Siddhivinayak Temple : महानायक अमिताभ बच्चन यांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

गेली जवळपास 30 वर्षे मी या शहरात आणि पोलीस दलात विविध पदांवर काम केले आहे. मुंबई पोलिसांची स्वत:ची एक गौरवशाली परंपरा आणि इतिहास आहे. किंबहुना मुंबईच्या पोलिसांची नेहमीच स्कॉटलंडच्या पोलिसांशी तुलना होत आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाचा आयुक्त या नात्याने मुंबईकर जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. ही बाब माझ्यासाठी गौरवास्पद आणि अभिमानाची असल्याचे ते म्हणाले.

आपल्या पत्रात पांडे पुढे म्हणाले, मुंबई पोलीस दलातील सर्व अधिकारी व अंमलदारांच्या साथीने मी मुंबईकर जनतेला आश्वस्त करू इच्छितो की, त्यांच्या मदतीसाठी, संरक्षणासाठी आणि एकूणच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस 24 तास सज्ज आहेत. असे म्हणत त्यांनी मुंबईकरांचे आभार मानले आहेत. संजय पांडे यांची नुकतीच मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या आधी हेमंत नगराळे हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यांची आता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिकृत अकाऊंटवरून हे पत्र ट्वीट करण्यात आले आहे. ज्यात पोलीस आयुक्त संजय पांडे म्हणाले आहेत की, या कठीण काळात आणि एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आपल्यालाही अनेक अडचणी भेडसावत असणार. त्यामुळे, मुंबई पोलीस दलाच्या कामकाजात काही सुधारणा होणे आवश्यक वाटत असल्यास व त्याबाबत आपल्या काही सूचना असल्यास मला 9869702747 या क्रमांकावर जरूर कळवा. ते म्हणाले आहेत की, अनेकवेळा अगदी छोट्या सूचनाही मोठे बदल घडवून आणू शकतात. त्यामुळे, योग्य सूचनांची दखल घेऊन त्यानुसार बदल घडवून आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल.

हेही वाचा - दिशा सालियान प्रकरण: नारायण राणे आणि नितेश राणे उद्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची शक्‍यता

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.