ETV Bharat / city

Mumbai Corona Update : चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली; सोमवारी १११८ नवे रुग्ण

author img

By

Published : Jun 13, 2022, 8:12 PM IST

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update

मुंबईत सोमवारी १११८ रुग्णांची नोंद ( 1118 New corona patients Mumbai ) झाली आहे. काल ( रविवारी ) २ मृत्यूंची नोंद झाली होती. आज शून्य मृत्यूची नोंद होत होती. मुंबईत सध्या ४७८ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ३३ रुग्ण ऑक्सिजनवर, ६४ रुग्ण आयसीयूमध्ये तर ८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

मुंबई - मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या ( Mumbai Corona Update ) रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. रोज १७०० ते १९०० रुग्णांची नोंद होत आहे. मात्र रविवारी चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्येत घट झाली आहे. आज ( सोमवारी ) १११८ रुग्णांची नोंद ( 1118 New corona patients Mumbai ) झाली आहे. काल ( रविवारी ) २ मृत्यूंची नोंद झाली होती. आज शून्य मृत्यूची नोंद होत होती. मुंबईत सध्या ४७८ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ३३ रुग्ण ऑक्सिजनवर, ६४ रुग्ण आयसीयूमध्ये तर ८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर बी ए व्हरेरियंटचे ४ रुग्ण आढळून आले असून ते बरे झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.



११ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह : मुंबईत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत गेल्या २४ तासात ९६२२ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १११८ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात ११ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ६७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ८१ हजार ८६५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ५० हजार ९६१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ११ हजार ३३१ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४७५ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.१४४ टक्के इतका आहे.




८ रुग्ण व्हेंटिलेटरवर : मुंबईत आज आढळून आलेल्या १११८ रुग्णांपैकी १०४६ म्हणजेच ९४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ८७७ बेड्स असून त्यापैकी ४७८ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ३३ रुग्ण ऑक्सिजनवर, ६४ रुग्ण आयसीयूमध्ये तर ८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.



रुग्णसंख्या वाढतेय : मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. मे महिन्याच्या अखेरीस ३१ मे ला ५०६, १ जून ला ७३९, २ जून ला ७०४, ३ जूनला ७६३, ४ जून ला ८८९, ५ जून ला ९६१, ६ जून ला ६७६, ७ जून ला १२४२, ८ जूनला १७६५, ९ जूनला १७०२, १० जूनला १९५६, ११ जूनला १७४५, १२ जूनला १८०३, १३ जूनला १११८ रुग्णांची नोंद झाली आहे.


१०६ वेळा शून्य मृत्यूची नोंद : मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १०६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा तर जून महिन्यात ७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.



बी ए व्हरेरियंटचे ४ रुग्ण : मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळेच्या अहवालानुसार बी ए ४ चे ३ तर बी ए ५ व्हरेरियंटचा १ असे एकूण ४ रुग्ण आढळून आला आहे. हे सर्व रुग्ण १४ ते २४ मे कालावधीतील असून दोन ११ वर्षांच्या मुली तर दोन ४० ते ६० वर्षे वयोगटातील पुरुष आहेत. हे सर्व रुग्ण घरगुती विलगिकरणात बरे झाले आहेत असे पालिकेच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.

हेही वाचा - देशात पुन्हा कोरोनाचा कहर; आठवड्यात 70 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील दोन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.