ETV Bharat / state

देशात पुन्हा कोरोनाचा कहर; आठवड्यात 70 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील दोन

author img

By

Published : Jun 13, 2022, 1:12 PM IST

Updated : Jun 14, 2022, 12:32 PM IST

Covid
संग्रहित छायाचित्र

देशात कोरोना आटोक्यात येत असताना अचानक कोरोनाग्रस्तांची वाढण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली, कर्नाटक, केरळसह महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. मागील 24 तासांत (दि. 12 जून रात्रीपर्यंत) देशभरात 8 हजार 84 नव्या कोनाग्रस्तांची नोंद झाली असून त्यापैकी महाराष्ट्रात ( Maharashtra Corona Update ) 2 हजार 946 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दोघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

मुंबई - देशात कोरोना आटोक्यात येत असताना अचानक कोरोनाग्रस्तांची वाढण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली, कर्नाटक, केरळसह महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. मागील 24 तासांत (दि. 12 जून रात्रीपर्यंत) देशभरात 8 हजार 84 नव्या कोनाग्रस्तांची नोंद झाली असून त्यापैकी महाराष्ट्रात ( Maharashtra Corona Update ) 2 हजार 946 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दोघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यातील एकट्या मुंबईत ( Mumbai Corona Update ) 1 हजार 803 रुग्ण आढळले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

आकडेवारी
आकडेवारी

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण - मागील 24 तासांत देशभरात 8 हजार 84 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात राज्यात नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात 2 हजार 946 ( Coronavirus in Maharashtra ) त्याखालोखाल केरळ ( Coronavirus in Kerala ) राज्यात 1 हजार 955 रुग्ण, दिल्लीत ( Coronavirus in Delhi ) 735 रुग्ण तर कर्नाटक राज्यात ( Coronavirus in Karnataka ) 463 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाकडून ( Ministry of Health ) देण्यात आली आहे.

सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे 48 हजार - देशातील सक्रिय रुग्णांची ( Active Corona Patients in India ) संख्या 47 हजार 995 इतकी झाली असून त्यापैकी काही कमी जोखीम तर काही अति जोखीमेतील रुग्ण आहेत. आतापर्यंतच्या एकून कोरोनाग्रस्त रुग्णापैकी 0.11 टक्के सक्रिय रुग्णांची संख्या आहे. त्यातील 16 हजार 370 सक्रिय रुग्ण हे महाराष्ट्रातील ( Active Corona Patients in Maharashtra ) आहेत.

आठवड्यात 70 रुग्णांचा मृत्यू - कोरोनाच्या दोन लाटा यशस्वरित्या थोपल्यानंतर तिसऱ्या लाटेमध्ये कोरोना आटोक्यात आला होता. मात्र, अचानक कोरोना वाढत असून 6 ते 12 जून या कालावधीत देशभरात तर 70 रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला. त्यापैकी 6 ते 12 जून या कालावधीत महाराष्ट्रात 17 हजार 380 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून दोन मृत्यूंची नोंद झाली आहे.

देशाचा पॉझिटिव्हिटी दर - मागील 24 तासांत भारतात 2 लाख 49 हजार 418 कोरोना चाचण्या झाल्या. त्यापैकी 3.24 टक्के म्हणजेच 8 हजार 84 जण कोरोनाग्रस्त आढळले. आठवड्याभराचा पॉझिटिव्हिटी दर ( Corona Positivity Rate of India ) 2.21 टक्के आहे. सक्रिय रुग्णाचा दर 0.11 टक्के आहे तर रुग्ण बरा होण्याचा दर 98.68 टक्के इतका आहे.

महाराष्ट्राचा पॉझिटिव्हिटी दर - राज्यात आतापर्यंत 8 कोटी 13 लाख 21 हजार 768 कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी 09.73 टक्के ( Corona Positivity Rate of Maharashtra ) म्हणजेच 79 लाख 10 हजार 577 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 1.68 टक्के म्हणजेच 1 लाख 47 हजार 870 रुग्णांनी आपला जीव गवामला असून 97.92 टक्के म्हणजेच 77 लाख 56 हजार 337 जण कोरोनामुक्त झाले आहे.

हेही वाचा - Sonia Gandhi In Hospital: सोनीया गांधी यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

Last Updated :Jun 14, 2022, 12:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.