ETV Bharat / city

१८२ ST Workers Dismissed : मोठी कारवाई.. एकाच दिवसात एसटीचे १८२ कर्मचारी केले बडतर्फ

author img

By

Published : Dec 24, 2021, 7:37 PM IST

Updated : Dec 24, 2021, 8:28 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांचा संप
एसटी कर्मचाऱ्यांचा संप

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई केली ( MSRTC Action On Workers ) आहे. एकाच दिवसात एसटीच्या १८२ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले ( १८२ ST Workers Dismissed ) आहे. त्यामुळे आतापर्यंत बडतर्फ करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या २५० वर पोहोचली आहे.

मुंबई : दिवाळीपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु ( ST Workers Strike ) आहे. एसटी महामंडळ शासनात विलीन करण्याची प्रमुख मागणी आहे. मात्र शासनाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई केली ( MSRTC Action On Workers ) आहे. एकाच दिवसात एसटीच्या १८२ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले ( १८२ ST Workers Dismissed ) आहे. त्यामुळे आतापर्यंत बडतर्फ करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या २५० वर पोहोचली आहे.

६०० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरु असलेला संप दिवसेंदिवस चिघळत जात आहे. तब्बल ५७ दिवस होऊन सुद्धा एसटीचा संप सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एसटी कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने कारवाई सुरु केली आहे. महामंडळाने आतपर्यत राेजंदारीवरील २ हजार ५६ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून, १० हजार ७३१ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. याशिवाय २ हजार ७९६ कर्मचाऱ्यांचा बदल्या केल्या आहे. मात्र, निलंबनाच्या कारवाई नंतरही कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. १० हजार ७३१ निलंबित कामगारांना शेवटची संधी महामंडळाकडून देण्यात आलेली होती. मात्र, संधी देऊन सुद्धा निलंबित कर्मचारी कामावर हजर झाले नाही. त्यामुळे आता निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून देण्यात सुरुवात केली आहे. गेल्या दोन आठवड्यापासून आतापर्यत ६०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून बजवाली आहे. तर आज महामंडळाने १८२ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या २४१ वर पोहचली आहे.

संप सोडून आज २ हजार १८ कर्मचारी कर्तव्यावर

संपात सहभागी होणाऱ्या निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या कारवाईच्या धास्तीने मोठ्या प्रमाणात कर्मचारी आता कर्तव्यावर हजर होत आहे. आज राज्यभरात संप सोडून नव्याने २ हजार १८ कर्मचारी हजर झाले. आज राज्यभारतील ९२ हजार कर्मचाऱ्यांपैकी २५ हजार १८ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. कालपेक्षा आज कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. काल २३ हजार ३०३ कर्मचारी कामावर हजर झाले होते.

Last Updated :Dec 24, 2021, 8:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.