ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत रुग्णवाढ सूरुच, ३७५ नवे रुग्ण, शून्य मृत्यूची नोंद

author img

By

Published : May 29, 2022, 7:35 PM IST

मुंबई कोरोना अपडेट
मुंबई कोरोना अपडेट

मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट ( The Third wave of Corona Virus ) आटोक्यात आल्यानंतर रुग्णसंख्येत घट ( Decrease in Patients ) झाली होती. त्यावेळी ५० च्या आत रुग्णसंख्या नोंदवली जात होती. त्यात काही दिवसात वाढ झाली आहे. गेले दोन दिवस ३०० हुन अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आज रविवारी ३७५ नव्या रुग्णांची तर शून्य मृत्यूची नोंद ( Deaths ) झाली आहे.

मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट ( The Third wave of Corona Virus ) आटोक्यात आल्यानंतर रुग्णसंख्येत घट ( Decrease in Patients ) झाली होती. त्यावेळी ५० च्या आत रुग्णसंख्या नोंदवली जात होती. त्यात काही दिवसात वाढ झाली आहे. गेले दोन दिवस ३०० हुन अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आज रविवारी ३७५ नव्या रुग्णांची तर शून्य मृत्यूची नोंद ( Deaths ) झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून २ हजार ७० सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्णसंख्या वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

३७५ नवे रुग्ण - मुंबईत आज रविवारी ३७५ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज २३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६४ हजार ९८७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४३ हजार ३४२ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २ हजार ७० सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २ हजार ८७२ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०२४ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ३७५ रुग्णांपैकी ३५८ म्हणजेच ९५ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ४७२ बेड्स असून त्यापैकी ८९ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत.

रुग्णसंख्या वाढतेय - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या पुन्हा १०० च्या वर गेली आहे. ३ मे रोजी १००, ४ मे रोजी ११७, ५ मे रोजी १३०, ६ मे रोजी ११७, ७ मे रोजी १७२, ८ मे रोजी १२३, ९ मे रोजी ६३, १० मे रोजी १२२, ११ मे रोजी १२४, १२ मे रोजी १३९, १३ मे रोजी १५५, १४ मे रोजी १३१, १५ मे रोजी १५१, १७ मे रोजी १५८, १८ मे रोजी १९४, १९ मे रोजी २२३, २० मे रोजी २१३, २१ मे रोजी १९८, २२ मे रोजी २३४, २३ मे रोजी १५०, २४ मे रोजी २१८, २५ मे रोजी २९५, २६ मे रोजी ३५०, २७ मे रोजी ३५२, २८ मे रोजी ३३०, २९ मे रोजी ३७५ रुग्णांची नोंद झाली आहे.

९७ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर, २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ९७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा तर मे महिन्यात २६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा - International Film Festival : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आज मुंबईत उद्घाटन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.