ETV Bharat / city

Cruise drug case : आर्यन खानसह मर्चंट, धामेचा यांची चौथ्यांदा एनसीबी कार्यालयात हजेरी

author img

By

Published : Nov 26, 2021, 7:12 PM IST

आर्यन खान एनसीबी कार्यालयात हजेरी
आर्यन खान एनसीबी कार्यालयात हजेरी

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना न्यायालयाने ( Bail conditions in Cruise drug case ) काही अटीवर जामीन दिला होता. दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली होती. त्यानुसार हजर झालेल्या केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या एनसीबी दिल्लीतील विशेष पथकाने शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याचा नवी मुंबईतील एनसीबी कार्यालयात जबाब नोंदविला

मुंबई - क्रुझ ड्रग प्रकरणात ( Aryan Khan visited NCB office in Cruise drug case ) आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांनी एनसीबी कार्यालयात आज हजेरी लावली. या तिन्ही आरोपींना न्यायालयाने दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली होती.

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना न्यायालयाने ( Bail conditions in Cruise drug case ) काही अटीवर जामीन दिला होता. दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली होती. त्यानुसार हजर झालेल्या केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या एनसीबी दिल्लीतील विशेष पथकाने शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याचा नवी मुंबईतील एनसीबी कार्यालयात जबाब नोंदविला. जामीन मिळाल्यानंतर एनसीबी कार्यालयात हजर राहण्याची आर्यन खान याची ही चौथी वेळ आहे. आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा हेसुद्धा ( Arbaaz Merchant and Moonmoon Dhamecha in NCB office ) आज हजेरी लावायला आले होते. हजेरी लावताना प्रत्येक वेळी त्याला जामिनाचे कागदपत्र सादर करून एनसीबीच्या हजेरी पुस्तकात सही करावी लागते.

हेही वाचा-Cruise Drug Case : आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाहीत, कट कारस्थानही रचले नाही - मुंबई उच्च न्यायालय


नेमके काय आहे प्रकरण?

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबरला एनसीबीने क्रुझवर सुरु असलेल्या पार्टीवर छापा मारला होता. यावेळी काही जणांकडे ड्रग्ज आढळल्याचा एनसीबीचा दावा आहे. याच प्रकरणात त्यावेळी आर्यनसह 8 जणांना अटक करण्यात आली होती. पुढे तब्बल 27 दिवसानंतर आर्यन खानची 30 ऑक्टोबर रोजी आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली होती. उच्च न्यायालयाने आर्यन खानला अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार त्याला प्रत्येक शुक्रवारी मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.

हेही वाचा-आर्यन खानविरुध्द कट रचणाऱ्यांना शाहरुख शिकवणार धडा?

मुंबई उच्च न्यायालयाकडून एनसीबीच्या तपासावरच प्रश्नचिन्ह

क्रूझ ड्रग पार्टी ( Cruise Drug Case ) प्रकरणात आर्यन खानकडे ( Aryan Khan ) ड्रग्ज सापडले नाही. त्याच्या Whats App चॅटमध्ये कट कारस्थान करण्याचा हेतू असल्याचे आढळून आले नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) 20 नोव्हेंबरच्या सुनावणीत म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या ऑर्डर कॉपीमध्ये ही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे एकप्रकारे एनसीबीच्या ( NCB ) तपासावरच न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आर्यन खान ड्रग प्रकरणावरून राजकारण -

NCB ने क्रूझवर केलेल्या कारवाईनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. ही कारवाई कशी खोटी आहे हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक रोज एक ट्विट करत खुलासे करून दाखवत आहेत. दुसरीकडे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावरही अनेक गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केले आहेत. दरम्यान, हे सर्व आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळून लावले आहेत. त्यानंतर पंच प्रभाकर साईल यानेही समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. सध्या या सर्व प्रकरणांची एनसीबीची एसआयटी चौकशी करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.