ETV Bharat / city

Assembly Budget Session 2022 : अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवारांची रामटेकवर खलबते

author img

By

Published : Mar 2, 2022, 9:56 PM IST

Thackeray
Thackeray

र्थसंकल्प अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या चहापान आणि पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थि होते. त्यानंतर आता मुख्यमंत्रा ठाकरे मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावर पोहचले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्य्मंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक पार पडणार आहे.

मुंबई - अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या चहापान आणि पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावर पोहचले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

उद्यापासून अर्थसंकल्प अधिवेशनाला सुरुवात होत आहे, त्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. आघाडीत महत्त्वाचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या राजीनाम्यावरुन उद्या विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तेव्हा विरोधकांच्या आक्रमणाला महाविकास आघाडीने एकत्रित उत्तर देण्याची रणनीती या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Budget Session 2022 : 'या' मुद्यांवर अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजण्याची शक्यता; पाहा, विशेष रिपोर्ट...


ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.