ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : ... म्हणून विधानसभा अध्यक्ष म्हणून, तुम्ही किती काळ टिकाल ? सुनील प्रभूंचा घणाघात

author img

By

Published : Jul 3, 2022, 5:00 PM IST

Maharashtra Speaker Assembly
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष

इतिहास कधीही या प्रसंगाला विसरणार नाही. 39 आमदारांनीही व्हीप मोडून मतदान केल आहे. त्यामुळे या सरकारचा कार्यकाळ किती का असेल? आपण विधानसभा अध्यक्ष म्हणून, किती काळ बसाल ? असा प्रश्न शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई - विशेष अधिवेशनाच्या ( Assembly ) पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष म्हणून, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) गटाकडून उमेदवार असलेल्या राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar ) यांची निवड करण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून, निवड झाल्यानंतर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यासाठी अभिनंदन भाषण केले. मात्र हे भाषण करत असताना शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी राहुल नार्वेकर यांचं विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन आपल्या भाषणातून केले आहे. मात्र, विधानसभा अध्यक्ष म्हणून तुमचा कार्यकाळ किती असेल असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.

आपण अध्यक्ष होत असताना शिवसेनेच्या 39 आमदारांनी व्हीप झुगारून, पक्षाच्या विरोधात मतदान केले आहे. इतिहास कधीही या प्रसंगाला विसरणार नाही. 39 आमदारांनीही व्हीप मोडून मतदान केल आहे. त्यामुळे या सरकारचा कार्यकाळ किती का असेल? आपण विधानसभा अध्यक्ष म्हणून, किती काळ बसाल ? असा प्रश्न शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी उपस्थित केला आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष म्हणून सत्ताधारी आणि विरोधक असे सर्वांना समान न्याय राहुल नार्वेकर यांच्याकडून मिळेल, अशी आशा सुनील प्रभू यांनी व्यक्त केली आहे.

फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याचे दुःख - देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावा लागलं आहे, याचं दुःख मित्र म्हणून, आपल्याला नक्कीच आहे. ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावी लागली. हे समजलं त्यावेळेस आम्ही आमचं दुःख बाजूला ठेवून एक मित्र म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी दुःख झालं असल्याचा टोला सुनील प्रभू यांनी आपल्या भाषणाच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

हेही वाचा - Umesh Kolhe Murder Case : एनआयए पथकासह अमरावती पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.