ETV Bharat / city

Umesh Kolhe Murder Case : एनआयए पथकासह अमरावती पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी

author img

By

Published : Jul 3, 2022, 3:50 PM IST

Updated : Jul 3, 2022, 6:52 PM IST

औषध विक्रेते उमेश कोल्हे हत्या प्रकरणामध्ये ( Drug Dealer Umesh Kolhe Murder Case ) पोलिसांनी सात जणांना अटक ( Seven People have been Arrested so Far ) केली आहे. अमरावती शहरातील शेख इरफान शेख रहीम ( Sheikh Irfan Sheikh Rahim ) याला पोलिसांनी शनिवारी रात्री नागपूर येथे अटक करून रविवारी पहाटे त्याला शहर कोतवाली पोलीस ठाण्यात आणले आहे. शहर कोतवाली पोलीस ठाण्यात पोलिसांसह एनआयएचे पथक आरोपींची सध्या कसून चौकशी करीत आहेत.

Squad of NIA
एनआयएचे पथक

अमरावती : औषध विक्रेते उमेश कोल्हे हत्या प्रकरणात ( Drug Dealer Umesh Kolhe Murder Case ) पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक ( Seven People have been Arrested so Far ) केली आहे. अमरावती शहरातील कमेला ग्राउंड परिसरात राहणारा शेख इरफान शेख रहीम ( Sheikh Irfan Sheikh Rahim ) याला पोलिसांनी शनिवारी रात्री नागपूर येथे अटक करून रविवारी पहाटे त्याला शहर कोतवाली पोलीस ठाण्यात आणले आहे. शहर कोतवाली पोलीस ठाण्यात पोलिसांसह एनआयएचे पथक ( Squad of NIA ) आरोपींची सध्या कसून चौकशी करीत आहेत.

एनआयए प्रकरण हाती घेण्याची शक्यता : नुपूर शर्मा यांच्या संदर्भातील पोस्ट उमेश कोल्हे यांनी एका व्हाॅट्सअॅप ग्रुपवर शेअर केल्यामुळे त्यांची 21 जून रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास श्याम चौक परिसरालगत असणाऱ्या घंटी घड्याळलगत हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण अमरावती शहर हादरले असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाचा तपास एनआयए करणार असे स्पष्ट केले. एनआयएचे पथक गत तीन दिवसांपासून अमरावती येथे ठाण मांडून असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला वेग देत सात जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी केली आरोपींची चौकशी : या प्रकरणात मुदसिर अहमद उर्फ सोनू (वय 22) शाहरुख पठाण उर्फ बादशाह हिदायत खान (वय 25) अब्दुल तोफिक उर्फ नानू शेख तसलीम (वय 24) शोएब खान उर्फ भुऱ्या साबीर खान (वय 22) अतीब राशीत रशीद (वय 22) आणि युसुफ खान बहादुर खान (वय 44) आणि शेख इरफान शेख रहीम यांचा समावेश आहे. आज अमरावती पोलीस हे संपूर्ण प्रकरण एनआयएकडे सुपूर्द करण्याची शक्यता असून, पोलिसांनी अटक केलेल्या सातव्या आरोपीला चार वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे.

एनआयए पथकाकडून कसून चौकशी

डॉक्टर युसुफ खान बहादुर खान याची कसून चौकशी : या प्रकरणातील आरोपी डॉक्टर युसुफ खान बहादुर खान हा व्हेटर्नरी डॉक्टर असून याचे उमेश कोल्हे यांच्यासोबत अनेक दिवसांपासून व्यावसायिक संबंध होते. उमेश कोल्हे यांनी त्यांना अनेकदा आर्थिक मदत केल्याची ही माहिती समोर येत असून ज्या व्हाॅट्सअॅप ग्रुपमध्ये उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या संदर्भात पोस्ट शेअर केली होती त्या ग्रुपमध्ये डॉक्टर युसुफ खान बहादुर खान हादेखील होता. या प्रकरणात त्यांची नेमकी काय भूमिका होती याचा कसून तपास पोलीस करीत आहेत.


हेही वाचा : Umesh Kolhe Murder Case : अमरावती पोलीस आयुक्तांची एनआयए मार्फत चौकशी करावी - नवनीत राणा

Last Updated :Jul 3, 2022, 6:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.