ETV Bharat / city

Raj Thackeray Speech Controversy: मनसेकडून महाआरती रद्द, तर राज ठाकरेंवर कारवाईची अनेकांची मागणी; वाचा दिवसभरात काय घडलं?

author img

By

Published : May 2, 2022, 7:42 PM IST

Updated : May 2, 2022, 7:55 PM IST

Raj Thackeray Latest News
Raj Thackeray Latest News

महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray Aurangabad Rally ) यांनी औरंगाबादमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा ( Mosque Loudspeaker Controversy ) हा काढत, हा विषय धार्मिक नसून सामाजिक असल्याचे म्हटले. मात्र राज ठाकरे यांच्या या सभेनंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापू लागले आहे. यावर विविध स्थरावरून प्रतिक्रिया येत आहे. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी एमआयएम, वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) वतीने ( RPI Demand to Action on Raj Thackeray ) करण्यात आली आहे. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Statement On Raj Thackeray Aurangabad Rally ) यांनीही राज ठाकरे यांचे भाषण तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई - महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray Aurangabad Rally ) यांनी औरंगाबादमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा ( Mosque Loudspeaker Controversy ) हा काढत, हा विषय धार्मिक नसून सामाजिक असल्याचे म्हटले. मात्र राज ठाकरे यांच्या या सभेनंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापू लागले आहे. यावर विविध स्थरावरून प्रतिक्रिया येत आहे. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी एमआयएम, ( AIMIM ) वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) वतीने ( RPI Demand to Action on Raj Thackeray ) करण्यात आली आहे. तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Statement On Raj Thackeray Aurangabad Rally ) यांनीही राज ठाकरे यांचे भाषण तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा ढवळून निघाले आहे.

राज ठाकरेंच्या भाषणावर राजकिय प्रतिक्रिया - राज ठाकरे यांच्या भाषणातील भोंग्याच्या मुद्द्याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही विचारवंत आहोत. त्यामुळे, लोकांना त्रास होऊ नये, यासाठी आम्ही लढाई केली आहे. आंदोलने केली आहेत. प्रत्येकाने कायद्याचे पालन करायला पाहिजे. हे लेच्या पेच्यांचे राज्य नाही आहे. इथे गृहमंत्री आहेत. सरकार आहे. सरकारला माहित आहे काय करायचे ( sanjay raut on raj thackeray ) आहे, असे संजय राऊत म्हणाले. तर आम आदमी पक्षाकडून राज ठाकरेंवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्या प्रीती मेनन यांनी ही मागणी केली आहे. यासोबतच राज ठाकरेंनी सभेत सगळ्या नियमांचे उल्लंघन केले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी एमआयएम पक्षाचे नेते खासदार इम्तियाज जलील ( Imtiaz Jaleel on Raj Thackeray ) यांनी केली आहे. जलील यांनी शेरोशायरी अंदाजात राज ठाकरे ( Imtiaz Jaleel news Aurangabad ) यांच्यावर टिका केली. वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) वतीने ( RPI Demand to Action on Raj Thackeray ) राज ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

गृहमंत्र्यांनी दिले भाषण तपासण्याचे निर्देश - औरंगाबादमध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी चिथावणीखोर भाषण करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, असा आरोप होत आहे. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, 'कालच्या सभेमध्ये फक्त शरद पवार यांच्यावर टीका करणे आणि समाजामध्ये द्वेष निर्माण करायचा याचाच प्रयत्न केला आहे. कालच्या त्यांच्या भाषणाचे पोलिसांकडे रेकॉर्डिंग आहे. त्याच्यातून आक्षेपार्ह विधान, अटी शर्तींचा भंग केला आहे की नाही, ते सर्व बघून त्याच्यावर निर्णय घेतला जाईल. याबाबत औरंगाबादचे पोलीस आयुक्त अहवाल राज्य सरकारला उद्या सादर करतील आणि उद्या मुंबईत बैठक घेतल्यानंतर या बैठकीमध्ये चर्चेअंती काय करावे, याबाबत निर्णय घेतला जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन - राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून एक ट्विट करत अक्षय तृतीयेला होणारी महाआरती रद्द करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ईद या सणात कोणतेही विष कालवायचे नसून भोंग्यासंदर्भात मी मंगळवारी ट्विट करून भूमिका जाहीर करेल, असे म्हटले आहे.

औरंगाबादच्या सभेत काय म्हणाले राज ठाकरे? - आम्हाला राज्यात दंगे नको आहेत. मुस्लीम लोकांना पण त्रास होतो. हा धार्मिक विषय नाही, सामाजिक विषय आहे. त्याला धर्म लावला तर आम्ही धर्माने उत्तर देऊ. आम्हाला परिस्थिती खराब करायची नाही, असे राज ठाकरे ( Raj Thackeray Aurangabad rally ) यांनी सांगत, उत्तर प्रदेशात जर भोंगे काढले तर महाराष्ट्रात का नाही. सर्व भोंगे अनधिकृत आहेत, कोणाकडे परवानगी नाही, असा प्रश्न उपस्थित केला. तर तीन तारखेला ईद आहे. आम्हाला ती खराब करायची नाही. मात्र, चार तारखेला ऐकणार नाही. भोंगे बंद झाले नाही तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. तसेच या आधी पण लाऊड स्पीकरवर ( Raj Thackeray on Hanuman Chalisa in Aurangabad ) बोललो, अनेक जन बोलले, मी फक्त पर्याय दिला, तुम्ही जर काढले नाही, तर आम्ही हनुमान चालीसा ( Raj Thackeray on loudspeaker in Aurangabad rally ) मोठ्या आवाजात लावू. मस्जिदबरोबरच मंदिरांवरचे अनधिकृत भोंगे काढू. पण मस्जिदवरचे काढल्यानंतर, असेही ते म्हणाले.

Last Updated :May 2, 2022, 7:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.