ETV Bharat / city

India corona update today : भारतात कोरोनाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासात 13,615 नवीन कोरोना रुग्ण, 20 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Jul 12, 2022, 9:45 AM IST

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाचे ( Coronavirus ) सक्रिय रुग्ण 1,30,713 वर पोहोचले आहेत. कालच्या तुलनेत देशात कोरोनाच्या ( corona ) प्रकरणांमध्ये थोडीशी घट झाली आहे.

मुंबई - सध्या भारतात कोरोनाच्या प्रसाराने पुन्हा जोर पकडला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोविड-19 चे एकूण 13,615 नवीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, या धोकादायक व्हायरसमुळे 20 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,36,22,651 झाली आहे. (Coronavirus Update).

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार - देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 1,30,713 वर पोहोचले आहेत. कालच्या तुलनेत देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये थोडीशी घट झाली आहे. शनिवारी देशात 18,840 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

दिल्लीच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार - राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 544 नवीन रुग्ण आढळले असून आणखी 2 रुग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात कोरोनाचे 2760 नवीन रुग्ण एका दिवसात आढळले आहेत. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे (Corona Cases in Maharashtra). दोन्ही राज्यांच्या आरोग्य विभागाकडून कोरोना संसर्गाबाबत माहिती देण्यात आली. दिल्लीच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीत संसर्गाची 500 ते 600 प्रकरणे समोर आली आहेत.

दिल्लीमध्ये ओमिक्रॉनच्या अधिक संसर्गजन्य उपप्रकार - दरम्यान, डब्ल्यूएचओने म्हटलं आहे की, भारतात कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराचा BA.2.75 हा नवीन उप-प्रकार आढळून आला आहे. दिल्लीमध्ये ओमिक्रॉनच्या अधिक संसर्गजन्य उपप्रकार BA-4 आणि BA.5 ची प्रकरणं आढळून आली आहेत. परंतु तज्ञांनी म्हटलं आहे की घाबरण्याची गरज नाही कारण या उपप्रकारामुळे गंभीर संक्रमण होत नाही. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतातील लस कव्हरेज 198 कोटींवर पोहोचले आहे.

३.५८ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह - मुंबईत गेल्या २४ तासात ६ हजार ५४९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २३५ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात ३.५८ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ४३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख १९ हजार ०३० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ९५ हजार ८४९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार ५५७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १४४६ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०४७ टक्के इतका आहे.

रुग्णसंख्या स्थिर - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून १६ जूनला २३६६, २३ जूनला २४७९, ३० जुनला १२६५ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १ जुलैला ९७८, २ जुलैला ८११, ३ जुलैला ७६१, ४ जुलैला ४३१,५ जुलैला ६५९, ६ जुलैला ६९५, ७ जुलैला ५४०, ८ जुलैला ५३०, ९ जुलैला ४९९, १० जुलैला ३९९, ११ जुलैला २३५ रुग्णांची नोंद झाली आहे.

११० वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ११० वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा तर जुलै महिन्यात ४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा - India Floods : गुजरात, आसाम, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेशसह जवळपास अर्धा देश पुराच्या विळख्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.