ETV Bharat / city

वीज संकट अनेक ठिकाणी, सरकार तोडगा काढण्याचा प्रयत्न करतेय - राज्यपाल

author img

By

Published : Apr 26, 2022, 10:45 PM IST

राज्यपाल
राज्यपाल

- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) विरुद्ध महाविकास आघाडी सरकार ( Government ) हा वाद महाराष्ट्रसाठी नवा नाही. राज्यपाल आपल्या भाषणांमधून नेहमीच सरकारला चिमटे काढत असतात. राज्यपाल म्हणाले, जरुरी नाही सर्वांनी मंत्री, प्रशासकीय अधिकारी झाले पाहिजे तुम्ही जिथे कुठे असाल ते काही काम करावे ते प्रामाणिकपणे करा मन लावून करा. सूर्य रात्रीचा प्रकाश देऊ शकत नाही. रात्रीच्या वेळी दिवाच लागतो. अनेक गावात लाईटच नसते. असते का लहान मुलांनो तुम्हीच सांगा ?" राज्यपालांच्या प्रश्नावर तिथे उपस्थित असलेल्या सर्वांकडून नाही, असेच उत्तर आले. यावर राज्यपालांनी लगेच मंत्री सुनील केदार यांच्याकडे पाहिले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकली.

मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) विरुद्ध महाविकास आघाडी सरकार ( Government ) हा वाद महाराष्ट्रसाठी नवा नाही. राज्यपाल आपल्या भाषणांमधून नेहमीच सरकारला चिमटे काढत असतात. असाच काहीसा चिमटा राज्यपालांनी मंगळवारी देखील (दि. 26 एप्रिल) काढला. ते स्काऊट आणि गाईडच्या पुरस्कार सोहळ्यासाठी मुंबईच्या शिवाजी पार्क येथील स्काऊट गाईड पॅवेलीन येथे उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यात भाषण करताना त्यांनी राज्यातील विज संकटावर भाष्य करत सरकारवर निशाणा साधला आहे.

भाषणात काय म्हणाले राज्यपाल ? - स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना राज्यपाल सर्वांनी नेहमी खरं बोललं पाहिजे, सत्यवचन याबाबत मार्गदर्शन करत होते. यावेळी राज्यपाल म्हणाले, जरुरी नाही सर्वांनी मंत्री, प्रशासकीय अधिकारी झाले पाहिजे तुम्ही जिथे कुठे असाल ते काही काम करावे ते प्रामाणिकपणे करा मन लावून करा. सूर्य रात्रीचा प्रकाश देऊ शकत नाही. रात्रीच्या वेळी दिवाच लागतो. अनेक गावात लाईटच नसते. असते का लहान मुलांनो तुम्हीच सांगा ?" राज्यपालांच्या प्रश्नावर तिथे उपस्थित असलेल्या सर्वांकडून नाही, असेच उत्तर आले. यावर राज्यपालांनी लगेच मंत्री सुनील केदार यांच्याकडे पाहिले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकली.

कार्यक्रम संपल्यावर राज्यपालांचे स्पष्टीकरण - "वीज संकट अनेक ठिकाणी आहे आणि प्रत्येक सरकार ते दूर करण्यासाठी प्रयत्न करत असतात. याच माध्यमांनीही थोडे सहकार्य केले तर आणखी बरे होईल.", अशी प्रतिक्रिया राज्यपालांनी कार्यक्रम संपल्यावर माध्यमांशी बोलताना दिली.

मंत्री केदार काहीही न बोलताच निघून गेले - दरम्यान, राज्यपालांनी काढलेल्या या शाब्दिक चिमट्यांवर सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यावर पत्रकारांनी येथे उपस्थित असलेले मंत्री सुनील केदार ( Minister Sunil Kedar ) यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण, ते काहीही न बोलताच निघून गेले.

हेही वाचा - महाविकास आघाडीचा 'प्लॅन' आला समोर.. 'अशा'प्रकारे जिंकणार आगामी महानगरपालिका निवडणुका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.