ETV Bharat / city

Corona जिनोम सिकवेंसिंग चाचण्या, मुंबईत १०० टक्के रुग्ण ओमायक्रॉन व्हेरियंटचे

author img

By

Published : Aug 11, 2022, 10:51 PM IST

infection patients
infection patients

मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने १४ व्या फेरीत २३० नमुन्यांची तपासणी केली असता त्यात १०० टक्के रुग्णांना ओमायक्रॉन व्हेरियंटची ( Omicron variant ) बाधा झाल्याचे समोर आले आहे. रुग्णांना कोणत्या व्हेरियंटची लागण झाली आहे याची माहिती मिळण्यासाठी जिनोम सिकवेंसिंग चाचण्या ( Genome sequencing tests ) केल्या जात आहेत.

मुंबई - मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार ( Spread of corona virus ) आहे. हा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. रुग्णांना कोणत्या व्हेरियंटची लागण झाली आहे याची माहिती मिळण्यासाठी जिनोम सिकवेंसिंग चाचण्या ( Genome sequencing tests ) केल्या जात आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने १४ व्या फेरीत २३० नमुन्यांची तपासणी केली असता त्यात १०० टक्के रुग्णांना ओमायक्रॉन व्हेरियंटची ( Omicron variant ) बाधा झाल्याचे समोर आले आहे.

BA २.७४ व्हेरिएन्टचे सर्वाधिक रुग्ण - कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट २०२१ पासून नियमितपणे व फेरीनिहाय जिनोम सिकवेंसिंग चाचण्या केल्या जात आहेत. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पश्चिम उपनगरे डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार महानगरपालिका क्षेत्रातील २३० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. २३० नमुन्यांपैकी २८ टक्के अर्थात ६४ नमुने हे BA २.७४ व्हेरिएन्टचे ( Most patients with BA variant ) आहेत. २० टक्के अर्थात ४५ नमुने हे B A २.७५ व्हेरिएन्टचे आहेत. आणखी २० टक्के म्हणजेच ४५ नमुने हे BA २.७६ व्हेरिएन्टचे आहेत. तर १२ टक्के अर्थात २८ नमुने हे BA २.३८ व्हेरिएन्टचे आहेत. ८ टक्के म्हणजेच १९ नमुने हे BA ५ व्हेरिएन्टचे आहेत. तर ७ टक्के अर्थात १८ नमुने हे इतर व्हेरिएन्टचे आहेत. ४ टक्के म्हणजेच ९ नमुने हे BA २.३८.१ व्हेरिएन्टचे आहेत. तर १ टक्के अर्थात २ नमुने हे BA ४ व्हेरिएन्टचे आहेत.


लहान मुलांमध्ये गंभीर लक्षणे नाहीत - २३० रुग्णांपैकी ० ते २० वर्षे यामधील २६ म्हणजेच ११ टक्के, २१ ते ४० वर्षे यामधील ६८ म्हणजेच ३० टक्के, ४१ ते ६० वर्षे यामधील ६० म्हणजेच २६ टक्के, ६१ ते ८० वर्षे मधील ५९ म्हणजेच २६ टक्के तर ८१ ते १०० वर्षे मधील १७ म्हणजेच ७ टक्के नमुने आहेत. चाचण्या करण्यात आलेल्या २३० नमुन्यांमध्ये ० ते १८ या वयोगटातील २० नमुन्यांचा समावेश होता. ज्यापैकी, ५ नमुने हे ० ते ५ वर्षे या वयोगटातील, ५ नमुने ६ ते १२ वर्षे या वयोगटातील; तर १० नमुने १३ ते १८ वर्षे या वयोगटातील होते. तथापि, या रुग्णांमध्ये कोविड बाधेची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत.


लस न घेतलेल्या एकाचा मृत्यू - एकूण २३० बाधितांपैकी, ७४ जणांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीचा एकही डोस घेतलेला नव्हता. त्यापैकी, १९ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील तिघांना अतिदक्षता उपचारांची गरज भासली. तर एका पुरुष रुग्णाचा मृत्यू ओढवला. ज्या रुग्णाचा मृत्यू ओढवला, त्याचे वय ४३ वर्षे होते. तसेच तो मधुमेह व हृदयविकाराने त्रस्त होता. लक्षणे गंभीर होऊ लागल्यानंतर तीन दिवसांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


कोरोना नियमांचे पालन करा - दरम्यान, विविध उप प्रकारातील कोविड विषाणुची होणारी लागण लक्षात घेता, ‘कोविड - १९’ विषाणू प्रतिबंधात्मक निर्देशांचे काटेकोर पालन प्रत्येकाने आपापल्या स्तरावर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘मास्क’चा सुयोग्य वापर, दोन किंवा अधिक व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर राखणे, नियमितपणे व सुयोग्य प्रकारे साबण लावून हात धुणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.Conclusion:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.