ETV Bharat / city

Bulli Bai App Case : बुल्लीबाई प्रकरणातील चौथ्या आरोपीला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

author img

By

Published : Jan 20, 2022, 8:07 PM IST

प्रातिनिधीक फोटो
प्रातिनिधीक फोटो

बुल्लीबाई प्रकरणातील चौथ्या आरोपीला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना 27 जानेवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई - बुल्लीबाई प्रकरणातील चौथ्या आरोपीला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नीरज बिश्नोई ज्या आरोपीला दिल्ली पोलिसांनी आसाममधून अटक केली होती. तो आणि सुली डील्सचा आरोपी ओंकारेश्वर ठाकूर यांना सायबर सेल मुंबई पोलिसांनी आज ( गुरुवारी) मुंबई न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 27 जानेवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याआधी 'या' आरोपींना झाली अटक

बुलीबाई अ‍ॅपच्या माध्यमातून आरोपी सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक शीख समुदायाशी निगडित नावे वापरली होती. समाजातील एकात्मता आणि सलोखा भंग व्हावा, हा या आरोपींचा उद्देश असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयात केला आहे. मुस्लीम महिलांचे मानसिक आणि शारिरीक शोषण करणे, अ‍ॅपमध्ये मुस्लिमांसाठी आक्षेपार्ह शब्द वापरून मुस्लीम महिलांचे फोटो आणि त्यांची माहिती अपलोड करण्याचे काम बुल्लीबाई या अ‍ॅपच्या माध्यमातून सुरू होते. दिल्लीपासून मुंबईपर्यंत महिलांनी याप्रकरणी तक्रारी केल्या आहेत. महिलांच्या ट्विटवर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरून माहिती घेत आणि त्यांचे फोटो चोरी करत टाकण्यात आले असून अशा 100 हून अधिक महिलांचे फोटो टाकून त्यांच्यावर बोली लावण्यात येत असल्याचे समोर आले. त्याविरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एफआयआर दाखल केली. त्यानंतर प्रथम विशाल कुमार झा आणि ५ जानेवारी रोजी उत्तराखंडमधून श्वेता सिंह आणि मयंक रावत या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.

या अ‍ॅपमध्ये काय आहे?

बुली बाई नावाच्या अ‍ॅपवर मुस्लीम महिलांना टार्गेट केले जात होते. अ‍ॅपवर त्यांच्याविरोधात घृणास्पद आणि घाणेरड्या गोष्टी लिहिल्या जात होत्या. वास्तविक, सुल्ली डील अ‍ॅपच्या धर्तीवरच बुली बाई अ‍ॅपवर काम केलं जात होते. सुल्ली डील हे गीटहबवर लाँच झालं होतं. तर बुलीबाई देखील गीटहबवरच लाँच झालेले आहे.

हेही वाचा - 'Bulli Bai' app case : ओडिसामधून पाचव्या आरोपीला केले अटक; मुंबई पोलीसांची कारवाई, तिघांचे जामिन फेटाळले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.