ETV Bharat / state

'Bulli Bai' app case : ओडिसामधून पाचव्या आरोपीला केले अटक; मुंबई पोलीसांची कारवाई, तिघांचे जामिन फेटाळले

author img

By

Published : Jan 20, 2022, 3:48 PM IST

Updated : Jan 20, 2022, 6:45 PM IST

मुंबई पोलिसांचा सायबर सेल ( Mumbai Police’s cyber cell ) कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सिंगला मुंबईत आणले जात आहे. दिल्लीतील न्यायालयाने शुक्रवारी इंजिनीअरिंगचे विद्यार्थी आणि 'बुल्ली बाई' अॅपचे निर्माते नीरज बिश्नोई (Bulli Bai app Creator) यांना जामीन देण्यास नकार दिला. नीरजला अॅप तयार केल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी आसाममधून (Delhi police Arrested neeraj from Assam) अटक केली होती.

bulli bai app case
bulli bai app case

भुवनेश्वर - मुंबई पोलीसांनी गुरूवारी बुली बाई केसमधील आरोपीला ओडिसामधून अटक (Mumbai Arrested Bulli bai accused) केली आहे. नीरज सिंग (Neeraj Singh) असे आरोपीचे नाव असून, या प्रकरणात अटक करण्यात आलेला पाचवा व्यक्ती आहे. यापूर्वी, विशाल झा, श्वेता सिंग, मयंक रावल आणि निरज बिश्नोई यांना GitHub अॅपमध्ये महत्वाच्या भूमिकेसाठी अटक करण्यात आली होती.

मुंबई पोलिसांचा सायबर सेल ( Mumbai Police’s cyber cell ) कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सिंगला मुंबईत आणले जात आहे.दिल्लीतील न्यायालयाने शुक्रवारी इंजिनीअरिंगचे विद्यार्थी आणि 'बुल्ली बाई' अॅपचे निर्माते नीरज बिश्नोई यांना जामीन देण्यास नकार दिला. नीरजला अॅप तयार केल्याबद्दल त्याला दिल्ली पोलिसांनी आसाममधून अटक केली होती. दरम्यान, बुली बाई अ‍ॅप प्रकरणातील तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज आज बांद्रा कोर्टाने फेटाळला. विशाल कुमार झा, श्वेता सिंह आणि मयंक रावत या आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले. सायबर पोलिसांकडून जामिनाला विरोध करण्यात आला. बुल्लीबाई प्रकरणातील चौथ्या आरोपीला 27 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. नीरज बिश्नोई ज्या आरोपीला दिल्ली पोलिसांनी आसाममधून अटक करण्यात आली तो आणि सुली डील्सचा आरोपी ओंकारेश्वर ठाकूर यांना सायबर सेल मुंबई पोलिसांनी आज मुंबई न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 27 जानेवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याआधी ४ आरोपींना केले होते अटक -

बुलीबाई अ‍ॅपच्या माध्यमातून आरोपी सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक शीख समुदायाशी निगडित नावे वापरली होती. समाजातील एकात्मता आणि सलोखा भंग व्हावा, हा या आरोपींचा उद्देश असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयात केला आहे. मुस्लीम महिलांचे मानसिक आणि शारिरीक शोषण करणे, अ‍ॅपमध्ये मुस्लिमांसाठी आक्षेपार्ह शब्द वापरून मुस्लीम महिलांचे फोटो आणि त्यांची माहिती अपलोड करण्याचे काम बुल्लीबाई या अ‍ॅपच्या माध्यमातून सुरू होते. दिल्लीपासून मुंबईपर्यंत महिलांनी याप्रकरणी तक्रारी केल्या आहेत. महिलांच्या ट्विटवर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरून माहिती घेत आणि त्यांचे फोटो चोरी करत टाकण्यात आले असून अशा 100 हून अधिक महिलांचे फोटो टाकून त्यांच्यावर बोली लावण्यात येत असल्याचे समोर आले. त्याविरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एफआयआर दाखल केली. त्यानंतर प्रथम विशाल कुमार झा आणि ५ जानेवारी रोजी उत्तराखंडमधून श्वेता सिंह आणि मयंक रावत या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.

सुल्ली डीलच्या मास्टरमाईंडला केलेली अटक

सुल्ली डिल अ‍ॅप प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कारवाई ( Sulli Deal App Mastermind Arrested ) केली होती. हे अ‍ॅप तयार करणारा मास्टरमाईंंड ओंकारेश्वर ठाकूर ( वय 25 वर्षे) याला इंदूरमधून पोलिसांनी ( Sulli Deal App Mastermind Arrested indore ) अटक केली आहे. बुल्लीबाई अ‍ॅप प्रकरणात ( Bulli Bai App Case ) अटक केलेल्या नीरज बिष्णोईकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. Bulli Bai आणि Sulli Deal या अ‍ॅपमध्ये काही अंतर नाही. दोन्ही अ‍ॅप्सचा माध्यमातून मुस्लिम महिलांचं मानसिक आणि शारिरीक शोषण करण्याचा उद्देश होता.

या अ‍ॅपमध्ये काय आहे? -

बुली बाई नावाच्या अ‍ॅपवर मुस्लीम महिलांना टार्गेट केले जात होते. अ‍ॅपवर त्यांच्याविरोधात घृणास्पद आणि घाणेरड्या गोष्टी लिहिल्या जात होत्या. वास्तविक, सुल्ली डील अ‍ॅपच्या धर्तीवरच बुली बाई अ‍ॅपवर काम केलं जात होते. सुल्ली डील हे गीटहबवर लाँच झालं होतं. तर बुलीबाई देखील गीटहबवरच लाँच झालेले आहे.

हेही वाचा - Bulli Bai App Case : बुल्ली बाई अॅप प्रकरणी केंद्राने एसआयटी स्थापन करावी - नीलम गोऱ्हे

Last Updated :Jan 20, 2022, 6:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.