ETV Bharat / city

Deepak Kesarkar: 'गतिमान आणि जनतेचे सरकार म्हणजे काय हे दाखवणार'- दीपक केसरकर

author img

By

Published : Jul 30, 2022, 10:20 AM IST

राज्यात सध्या केवळ दोन मंत्र्यांचे सरकार स्थापन झालेले आहे. मात्र असे असले, तरी या सरकारने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन राज्यात जनतेच्या हिताचे गतिमान सरकार कसे असते, हे दाखवणार असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला आहे.

दीपक केसरकर
दीपक केसरकर

प्रश्न - शिंदे सरकार जोरदार, वेगवान काम करत आहे, निर्णय घेत आहे. परंतु या सरकारने गेल्या १५ महिन्यांतील कामांना स्थगिती दिली आहे. जनतेच्या कामाला स्थगिती दिली आहे. डीपीडीसीतील अनेक काम थांबवली आहेत. डीपीडीसीतील काम त्या- त्या जिल्ह्यातील आणि लोकांना दिलासा देणारी काम असतात. सरकारने स्थगिती दिल्यामुळे जनतेच्या भावना दुखावतील असं वाटत नाही का ?

दीपक केसरकर - कोणतेही सरकार आलं की, मागच्या 6 महिन्यातील निर्णय स्थगित करत असतं. निर्णय स्थगित करणे ही एक प्रक्रिया असते, त्यानंतर एक आढावा घेतला जातो. अत्यावश्यक कामाला मंजुरी दिली जाते. प्रत्येक सरकारच्या प्रायोलिटी ठरलेल्या असतात. किंवा सरकारची प्रायोरिटी असेल, तर त्यात बदल करणे किंवा सुचवले जातात. शेतकऱ्यांना प्राधान्य द्यायचा असेल, तर इतर ठिकाणचे पैसे वळवावे लागतात. हा सगळा प्रत्येक सरकारच्या प्रायोरीटीचा प्रश्न असतो. शेतकरी आत्महत्या असेल, लोकांना चांगले रस्ते द्यायचे आहेत. काही शाळांच्या बाबतीत चांगले निर्णय घ्यायचे आहेत. काही लोक वादळाने पीडित झालेले असतात. कुठंच्या काळामध्ये विद्युत पुरवठा खंडित झालेला असतो. तेथे अंडरग्राउंड केबल करायचा असेल. आमची प्रायोरिटी महाराष्ट्राचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्यायचा असेल, तर मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येथे यायला लागतील. त्यासाठी जाळे विणावे लागेल, निर्णय घेण्याची प्रक्रिया जलद करावी लागेल आणि हे करत असताना मधल्या काळात काही योजना बंद केल्या असतील. जलशिवार योजनेसारखे अनेक योजना आणावे लागतील. जलशिवार योजनेत कोकण आणि गडचिरोली सारख्या जिल्ह्यांवर अन्याय झाला. हे होणार नाही याची दखल घ्यावी लागेल. कारण कोणतीही योजना राबवण्यापूर्वी तिचा व्यापक स्वरूपात महाराष्ट्रभर विचार करायला हवा असे केसरकर म्हणाले. केवळ योजना नाही तर स्वतंत्र क्षमता वाढवायला हवी. केवळ रस्ते पाणी वीज केलं म्हणजे सगळं संपलं असं नाही, त्या ठिकाणी एक स्ट्रेंथ असते. त्या भागाची ते लक्षात घेऊन तेथील उत्पन्न वाढल्यास लोक उद्योग शिक्षण सुधारेल. त्यासाठी प्रत्येकाची क्षमता वाढवायला हवी. शेतकऱ्यांचा उद्योग व्यापार कसा वाढवायचा यासाठी भर द्यायला हवा. अन्नप्रक्रिया निर्मितीवर भर द्यावा लागेल, मस्त उद्योग, शेती, पर्यटन विकास आदि गोष्टींवर द्यायला पाहिजेत.

दीपक केसरकर

प्रश्न - उद्धव ठाकरे यांच्या मुलाखती सुरू आहे. शिंदे गटावर घणाघाती टीका केली आहे. यातून सहानुभूती मिळेल आणि शिवसैनिक त्यांच्यासोबत राहील का ?

दीपक केसरकर - त्यांचा वाढदिवस होता. त्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या. उद्या धोरणात्मक गोष्टीवर बोलेल, उद्धव ठाकरेंवर कधीही बोलणार नाही. प्रत्येक गोष्टीत धोरणांवर अवलंबून असतात. प्रत्येक धोरण वेगवेगळे असतात. त्यामुळे धोरणात्मक बाबींवर बोलणं म्हणजे टीका करण्यासारखे नाही, असे मी समजतो. संजय राऊत यांनी वाढदिवसाच्या दिवशी अशी प्रश्न विचारून मुलाखत घ्यायला नको होते. वाढदिवसाच्या दिवशी विरोधात बोलायचं कसं ? हे सगळेच लोक पाळतात. महाविकास आघाडीमध्ये संजय राऊत यांचा मोठा वाटा होता. पुढे सरकार निर्मितीमध्ये तेवढे त्यांना महत्व दिले गेले नसेल, त्यामुळे ते राग काढत असेल, तर हा विचार करायला हवा. जेणेकरून स्वतःच्या पक्षासाठी चांगले योगदान देतील अशी मला खात्री आहे.

प्रश्न - सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्यासाठी तयारी सुरू आहे. तुमच्याकडून ही तयारी सुरू झाली आहे. शिवसेनेने 35 लाख शिवबंधन पत्र मागवली आहेत. आज ती जमा झाली आहेत, आपली काय तयारी आहे का ?

दीपक केसरकर - माझ्या हातात शिवबंधन धागा आहे. शेवटी पक्षांमध्ये फूट पडली ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही कितीही शिवबंधन पत्र मागवली, तरी त्यातून काही सिद्ध होत नाही. कार्यकर्त्यांना सांगितल्यावर पत्र तयार होतात. एखाद्याला सांगितलं सही कर तर तो सही करतो. मन जुळतील की नाही, पक्ष टिकेल की नाही, हा महत्त्वाचा भाग आहे. केवळ पक्ष टिकवला तर लोकांच्या समर्थन मिळू की नाही, हा वेगळा भाग आहे. तुमच्या पक्षाचे सदस्य म्हणजे जनता नाही. पक्षाचे सदस्य 5 टक्के असू शकतील 10 टक्के असू शकतील किंवा 15 टक्के असू शकतील. त्यावरती कोणत्याच पक्षाकडेही नाहीत. जनतेला काय वाटतं. त्यामुळे जनतेच्या विकासासाठी बांधिलकी असते. महाराष्ट्र हा पुढारलेले राज्य आहे. याचा फार मोठा उपयोग होईल असं मला वाटत नाही. आजच्या राजकारणामध्ये आघाड्यांशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही. पुढील काळात युतीने आघाडीचे राजकारण महाराष्ट्रासाठी अपरिहार्य आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या ताकदीवर निवडून येऊ शकणार. बाळासाहेब असताना ते ठीक होत. महाराष्ट्राला त्यांनी भुरळ घातली होती. त्यावेळची भूमिका आणि निर्णय ठीक होता. आता एकटाच राज्य येऊ शकत नाही, युती किंवा आघाडी गोविंद जिंकायचा हा तुमचा प्रश्न असतो. पक्षाच्या सातवा विरोधात तुम्ही येथे किंवा आघाडी केली, तर ते महाराष्ट्राच्या जनतेला आवडत नाही. त्यामुळे जनतेच्या प्रतिक्रिया शिवसेना विरोधात आहेत. एनसीपी वाढली. त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे याचा फटका मोठा बसणार आहे. आम्ही जर वेगळा विचार केला नसता, तर शिवसेना पूर्ण संपण्याच्या मार्गावर आली होती. सुरुवातीला क्रमामध्ये शिवसेना दोन नंबरला होती. मात्र, महाविकास आघाडी सरकार झाल्यापासून शिवसेना चार नंबरवर फेकली गेली. तर राष्ट्रवादी दोन नंबरला आली. शेवटी जनतेने दाखवून दिले आहे.

प्रश्न - आदित्य ठाकरे म्हणतायत, राजीनामे द्या आणि तुम्ही निवडून येऊन दाखवा. हे आव्हान तुम्ही स्वीकारता का ?

दीपक केसरकर - लोकांसमोर जाताना त्यावेळी तुम्ही युती म्हणून लोकांच्या समोर गेला. नंतर तुम्ही आघाडी बनवली, तेव्हा तुम्ही राजीनामे दिले का ? राजीनामे दिले नाही. त्यांच्या मतदार संघांमध्ये त्यांना एक वेगळं स्थान आहे. त्यांच्या मतदारसंघांमध्ये दोन- दोन आमदारांना विधान परिषदेवर घेतले जाते. सगळं त्यांच्या मतदारसंघात चालते. महापौर त्यांच्या मतदार संघातील असतो, ही सुरक्षा त्यांच्यासाठी असून प्रत्येकाला ते लाभलेलं नाही. परंतु, अनेक आमदार स्वतःच्या कर्तृत्वावर पाचवेळा निवडून आले आहेत. त्यांना अशारीतीने आव्हान देणे बरं नसते. त्यामुळे आम्ही युतीचे सरकार आम्ही आणलं. तुम्ही केलेली महाविकास आघाडी अनैसर्गिक होती. जनतेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पराभव केला होता. त्याच पक्षाला सोबत घेऊन सरकार स्थापन करता. तेव्हा तुम्ही राजीनामा द्यायला हवा. लोक मतांच्या विरोधात होते. युतीच्या विरोधात होते. तरुण आहेत त्यांचे विचार वेगळे असतील. त्यांना जो मान सन्मान मिळतो, तो त्यांच्या आजोबांमुळे मिळाली आहे. आदर टिकवायचा असेल, तर बदल करायला हवा. मंत्री झाले 55 आमदार ठाम आहेत. आज आपण त्यांना गळकी पाने म्हणतो, हे योग्य नाही. एकनाथ शिंदे हे जनतेतील नेते आहेत. सर्वसामान्य भेटतात त्यांच्या घरी हजारो कार्यकर्ते दिवसाला येतात. लोकांना वाटतं आपल्या स्वप्नातील मुख्यमंत्री झालेला आहे. आणि मुख्य म्हणजे प्रत्येक आलेल्या अर्जावर काहीतरी लिहितात. आजकाल अर्जावर लिहिणे फार दुर्मिळ झालेला आहे. त्याच्यामुळे एकंदरीतच लोक खुश आहेत. काही गोष्टी करायचे आहेत. एखाद्यावेळी लोकांची मन दुखावली तर त्याला काळ हे उत्तर आणि इलाज असणार आहे.

हेही वाचा - Koshyari controversial statement: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान; म्हणाले मुंबईतून गुजराथी राजस्थानी गेले तर आर्थिक राजधानीची ओळख मिटेल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.