ETV Bharat / city

Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यावर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपचेही लक्ष ; शक्तीप्रदर्शनासह राजकीय पक्षांची ठरणार रणनीती

author img

By

Published : Oct 4, 2022, 1:03 PM IST

Updated : Oct 4, 2022, 1:15 PM IST

Mahesh Tapase Spokesperson of NCP
महेश तपासे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते

एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांचा दसरा मेळावा पार पडणार (Dasara Melava 2022) आहे. सत्तांतर झाल्यानंतर हा पहिलाच मेळावा होणार असल्याने आपल्या मेळाव्यात प्रचंड गर्दी जमा व्हावी, यासाठी दोन्हीकडून तयारी सुरू आहे. मात्र हा दसरा मेळावा एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेचा असला तरी, यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे देखील तेवढेच लक्ष (NCP Congress and BJP focus on Dasara Melava) आहे.

मुंबई : एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांचा दसरा मेळावा पार पडणार (Dasara Melava 2022) आहे. सत्तांतर झाल्यानंतर हा पहिलाच मेळावा होणार असल्याने आपल्या मेळाव्यात प्रचंड गर्दी जमा व्हावी यासाठी दोन्हीकडून तयारी सुरू आहे. मात्र हा दसरा मेळावा एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेचा असला तरी, यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे देखील तेवढेच लक्ष (NCP Congress and BJP focus on Dasara Melava) आहे. दसरा मेळाव्याच्या माध्यमातूनच होऊ घातलेल्या पुढील निवडणुकांच्या रणनीती ठरणार असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जातेय.

उद्या दसरा मेळावा - एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेचा उद्या दसरा मेळावा पार पडणार आहे. आपल्या दसरा मेळाव्यात जास्तीत जास्त शिवसैनिक यावं यासाठी दोन्ही गटाकडून पूर्ण ताकद लावली जाते. एकनाथ शिंदे गटाने प्रत्येक जिल्ह्यातून शिवसैनिक मुंबईच्या बीकेसी मैदानावर यावा, यासाठी प्रयत्न केले जात असून, जवळपास तीन हजार बसेस बुक करण्यात आल्या आहेत. तर, रेल्वेने देखील शिंदे गट समर्थक मुंबईत येतील याची व्यवस्था केली जात आहे. मुंबईच्या बीकेसी मैदानावर जवळपास तीन लाख नागरिक बसू शकतील, अशी व्यवस्था शिंदे गटाकडून सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने देखील दसरा मेळाव्याची जय्यत तयारी केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातून दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर शिवसैनिक पोहोचेल यासाठी खुद्द शिवसेनाप्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं आहे. जवळपास 80 हजार ते एक लाख शिवसैनिक शिवाजी पार्क मैदानावर पोहोचतील, अशी आशा शिवसेनेला आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट ही आपली ताकद दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार (Shiv Sena Dasara Melava) आहेत.

इतर पक्षांचे मेळाव्यावर लक्ष - मात्र शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्या व्यतिरिक्तही इतर पक्ष या दसरा मेळाव्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत, कारण या दसरा मेळाव्याच्या माध्यमातूनच होऊ घातलेल्या पुढील निवडणुकांच्या रणनीत्या इतर पक्ष ठरवणार आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकार पाडलं आणि भारतीय जनता पक्षासोबत सलगी करून राज्यात नवं सरकार स्थापन केलं. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा जोरात व्हावा, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आहे. तर एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा जोरदार व्हावा, असा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे. एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मोठी गर्दी व्हावी, यासाठी भारतीय जनता पक्ष ताकत लावत असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहेत. मात्र एकनाथ शिंदे गटाचा हा दसरा मेळावा आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाचा कोणताही सहभाग नाही, असे सातत्याने स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाकडून देण्यात येत आहे. मात्र पुढची राजकीय गणित पाहता एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत असणाऱ्या पक्षांसाठी देखील हा दसरा मेळावा तेवढाच महत्त्वाचा असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी व्यक्त केलं (Eknath Shinde faction Dasara Melava) आहे.



मेळावा इतर पक्षांसाठी का महत्त्वाचा ? दसरा मेळावा हा एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेचा होणार आहे. मात्र या मेळाव्याच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतील. तर, दुसरीकडे महाविकास आघाडी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करेल. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना हे दोन पक्ष जरी आपली ताकद दसऱ्या बाळाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असले. तरी त्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकांवर होणार आहे. एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांची युती आहे. तर, शिवसेना महाविकास आघाडी मध्ये आहे. त्यामुळे शिवसेनेला बळकटी मिळाल्यास त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला होईल. तिथेच एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेत मोठी फूट पाडून आपली ताकद निर्माण केली, तर त्याचा थेट फायदा भारतीय जनता पक्षाला होईल याचं गणित इतर पक्षांनी व्यवस्थितपणे मांडल आहे. त्यामुळेच ज्या पक्षाचा दसरा मेळावा जोरदार होईल, त्या गटाला लोकांची सहानुभूती मिळेल. यासोबतच येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदार त्यांच्या बाजूने उभी राहतील, त्यामुळे या दसरा मेळाव्याचा इम्पॅक्ट हा निवडणुकांवर होणारे त्यामुळेच शिवसेनेचा दसरा मेळावा जोरदार व्हावा. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस कडून थेट प्रयत्न होतच नसले तरी, पक्षांतर्गत हालचाली नक्कीच सुरू आहेत. तर तिथेच एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा जोरदार व्हावा, यासाठी भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांचे हात मजबूत करत असल्याचे प्रवीण पुरो सांगतात.



राष्ट्रवादीचा शिवसेनेच्या मेळाव्याला पाठिंबा - मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्याची परंपरा शिवसेनेची आहे. बाळासाहेब ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाची धुरा या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून सोपवली. त्यामुळे खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे. हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार म्हणत आले आहेत. तर तिथेच दसरा मेळावा हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध नाही असे स्पष्टीकरण खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. मात्र उद्धव ठाकरे यांचा मेळावा जोरदार व्हावा, शिवसैनिक मोठ्या प्रमाणात दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर जावेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस कडून थेट मातोश्रीच्या परिसरात बॅनरबाजी करण्यात आली. तेथेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase Spokesperson of NCP) यांनी खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे. त्यामुळे दसरा मेळावा हा उद्धव ठाकरे यांचाच होईल, असं स्पष्ट केलं आहे.



शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ - शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडावा, यासाठी शिवसेनेने थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मदत घेतल्याचा आरोप सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून केला जातोय. भारतीय जनता पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा जोरदार व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून मदतीचा हात घेतला आहे. या दसरा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर तेथेच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट आपल्याला आमंत्रण दिल्यास आपण एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याच्या मंचावर जाऊ, असे संकेतच दिले आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून सर्वच पक्ष एकमेकांवर कुरघोडी देखील पाहायला मिळते.

Last Updated :Oct 4, 2022, 1:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.