Eknath shinde tweet : एकनाथ शिंदेंकडून कायद्याची भाषा सांगत शिवसेनेला रोखठोक उत्तर

author img

By

Published : Jun 24, 2022, 6:35 AM IST

Updated : Jun 24, 2022, 7:08 AM IST

Eknath shinde
Eknath shinde ()

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Shiv Sena rebel leader Eknath Shinde ) यांनी आता शिवसेनेलाच ( ShivSena ) कायद्याची भाषा सांगणे सुरू केले आहे. बंडखोर गटातील 12 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून विधानसभेच्या प्रभारी अध्यक्षांकडे करण्यात आली होती. त्यावर रोखठोक उत्तर देत शिंदे यांनी, कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय, कायदा आम्हालाही कळतो, असे प्रत्यूत्तर दिले आहे.

मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Shiv Sena rebel leader Eknath Shinde ) यांनी आता शिवसेनेलाच ( ShivSena ) कायद्याची भाषा सांगणे सुरू केले आहे. बंडखोर गटातील 12 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून विधानसभेच्या प्रभारी अध्यक्षांकडे करण्यात आली होती. त्यावर रोखठोक उत्तर देत शिंदे यांनी, कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय, कायदा आम्हालाही कळतो, असे प्रत्यूत्तर दिले आहे.

कायदा आम्हाला कळतो - पक्ष संघटनेच्या बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे आमच्या बारा आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी शिवसेनेने विधानसभेच्या प्रभारी अध्यक्षांकडे काल केली होती. अरविंद सावंत यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. त्याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्त्यूत्तर देत, कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.

  • कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय?
    तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो!
    घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही.
    यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.#RealShivsainik

    — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आमचीच शिवसेना खरी - कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे. 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत, अशी रोखठोक भाषा एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे.

हेच ते 12 आमदार - शिवसेनेच्या 12 आमदारांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. यामध्ये एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, संदीपान भुमरे, संजय शिरसाठ, अब्दुल सत्तार, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, अनिल बाबर, बालाजी किनीकर, यामिनी जाधव, लता सोनावणे महेश शिंदे, पक्षाच्या प्रतोदांनी सांगून सुद्धा हे सर्व बैठकीसाठी उपस्थित न राहिल्याने ही कारवाई करण्यात यावी, अशी शिवसेनेनी केली होती. हे पत्र आम्ही कायदेशीर तरतुदींनुसारच सर्व चाचपणी करून मगच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे दिले असल्याचे शिवसेना नेत्यांना सांगितले. या घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांनी आपलाही पावित्रा आक्रमक करीत कायद्याच्या भाषेतच उत्तर दिले.

राजकीय पटलावर वेगवान घडामोडी - विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने आपले पाचही उमेदवार निवडून आणत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला होता. हा धक्का महाविकास आघाडीचे नेते पचवत नाहीत त्याआधीच रात्रीतून शिवसेनेच्या आमदारांचा मोठा गट घेऊन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी गुजरात गाठले. शिवसेनेला हा मोठा धक्का होता. या बंडखोर आमदारांनी परत यावे म्हणून शिवसेनेकडून कायद्याची भाषा बोलली जाऊ लागली. त्याला शिंदे गटाकडून प्रत्यूत्तरही दिले जाऊ लागले. 12 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेने केल्यानंतर हे प्रकरण आता चांगलेच तापले आहे.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : 12 बंडखोर आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

Last Updated :Jun 24, 2022, 7:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.