ETV Bharat / city

Devendra Fadnavis Appreciated Bhavana Yadav : मातंग समाजातील पहिल्या महिला आयपीएस भावना यादव यांचे देवेंद्र फडणवीसांनी केले कौतुक

author img

By

Published : Jan 11, 2022, 4:33 AM IST

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

मातंग समाजातील पहिल्या महिला आयपीएस ( First Lady IPS In Matang Community ) होण्याचा मान मिळविलेल्या भावना यादव ( IPS Bhavana Yadav ) यांच्यावर ठिकठिकाणहून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आता राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या ( Devendra Fadnavis Appreciated Bhavana Yadav ) आहेत.

मुंबई - लोकसेवा आयोगाच्या केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंट परीक्षेत देशात १४ वा आणि मुलींमध्ये पहिला क्रमांक प्राप्त करून भावना यादव ( IPS Bhavana Yadav ) यांनी महाराष्ट्राची मान संपूर्ण देशात उंचावली आहे. यादव यांच्याशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ( Devendra Fadnavis Appreciated Bhavana Yadav ) केले. भावना यादव या मातंग समाजातील पहिल्याच महिला आयपीएस अधिकारी ( First Lady IPS In Matang Community ) आहेत.

मातंग समाजातील पहिल्या महिला आयपीएस भावना यादव यांचे देवेंद्र फडणवीसांनी केले कौतुक

मातंग समाजातील पहिल्याच महिला आयपीएस

केंद्रीय सशस्त्र दलाच्या ( Central Armed Group ) असिस्टंट कमांडंट पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत मुंबईच्या भावना यादव यांनी मोठे यश संपादन केले आहे. त्या या परीक्षेत देशातून १४ व्या आल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने ( Central Public Service Commission ) ही परीक्षा घेण्यात येते. भावनाचे वडील मुंबई पोलीस दलात ( Mumbai Police Force ) कार्यरत आहेत. भावना या सहाय्यक फौजदार सुभाष यादव यांच्या कन्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे ४ जानेवारी रोजी केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंट पदासाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये भावना देशातून चौदाव्या आल्या आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावना यादव यांच्याशी संवाद साधत त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भावना यादव या मातंग समाजातील पहिल्याच महिला आयपीएस अधिकारी आहेत, असेही म्हटले आहे.

२०१५ पासून दिल्या युपीएससीच्या परीक्षा

भावनाचे वडील पोलीस दलात असल्यामुळे त्यांना देखील याच क्षेत्राची आवड होती. याच क्षेत्रामध्ये करीअर करण्याचा निश्चय त्यांनी केला होता. त्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. मेहनत आणि जीद्दीच्या बळावर भावना यांनी यश मिळवले आहे. २०१५ पासून त्या युपीएससीची परीक्षा देत होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा त्या दोन वेळा उत्तीर्ण देखील झाल्या होत्या. परंतु त्यांना मैदानी परीक्षेत अपयश आले. मात्र, त्यांनी खचून न जाता प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर आज त्यांची केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंट पदासाठी निवड झाली असून, देशातून चौदावी येण्याचा बहुमान त्यांनी पटकवला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून उत्तीर्ण होणाऱ्या त्या एकमेव असून, त्यांनी मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.