ETV Bharat / city

Shiv Sena : न्यायालयात निर्णय होतात, मात्र न्याय मिळत नाही; शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांचे वक्तव्य

author img

By

Published : Jul 8, 2022, 5:22 PM IST

Decisions are made in court, but justice is not served; Statement by Manisha Kayande
न्यायालयात निर्णय होतात मात्र, न्याय मिळत नाहीत; मनीषा कायंदे याचे वक्तव्य

राज्यात सुरू असलेल्या घडामोडी विरोधात शिवसेना (Shiv Sena ) सर्वोच्च न्यायालयात ( Shiv Sena went to the Supreme Court ) गेली आहे. मात्र, न्यायालयात न्याय मिळेलच याची खात्री नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया शिवसेनेच्या प्रवक्त्या, आमदार मनीषा कायंदे ( MLA Manisha Kayande ) यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना व्यक्त केली आहे. सध्या धनुष्यबाण बंडखोरांना मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, धनुष्यबाण कोणीही हिरावू शकत नसल्याची स्पष्टोक्ती आमदार मनीषा कायंदे यांनी दिली.

मुंबई - शिवसेना पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली आहे शिवसेनेने विधानसभा अध्यक्षाची निवड आणि विश्वास दर्शक ठरावा विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबतीत सुनावणी झाल्यानंतर आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा असली तरी अलीकडे न्यायालयात निर्णय होतात मात्र, न्याय मिळत नाहीत अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे ( MLA Manisha Kayande ) यांनी व्यक्त केली आहे.

न्यायालयात निर्णय होतात मात्र, न्याय मिळत नाहीत; शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे याचे वक्तव्य

चिन्ह हा निवडणुकीचा विषय - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांनी पक्षाच्या चिन्हाबाबत सर्व शिवसैनिकांना मानसिकता तयार करा. कोणत्याही चिन्हावर आपण निवडणूक लढवू शकतो. शिवसैनिकांची नावे शिवसेनेची जोडलेली आहे उद्धव ठाकरे यांनी केवळ कार्यकर्त्यांची मानसिकता तयार व्हावी यासाठी तसे उद्गार व्यक्त केले आहेत. मात्र, शिवसेनेकडून कोणीही धनुष्यबाण हिरावू शकत नाही असा विश्वासही कायंदे यांनी व्यक्त केला. सध्या धनुष्यबाण बंडखोरांना मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, धनुष्यबाण कोणीही हिरावू शकत नसल्याची स्पष्टोक्ती माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. कायदेतज्ज्ञांशी सल्ला घेतल्यानंतरच हे बोलत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात सीबीआयकडून तीन गुन्हे दाखल, 16 ठिकाणी छापेमारी

शिवसैनिकांची कामे सुरूच - शिवसैनिक हा तळागाळातला कार्यकर्ता आहे तो लोकांमध्ये राहून काम करतो कोणतीही आपत्ती असो सर्वात आधी शिवसैनिक आणि शाखाप्रमुख हे रस्त्यावर उतरताना दिसतात सध्याही शिवसेनेचे अनेक शिवसैनिक आणि शाखाप्रमुख लोकांमध्ये उतरून मदतीचे काम करीत आहेत त्यामुळे शिवसैनिक हा शिवसेनेसोबत होता आणि राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुंख्यमंत्री ( CM Eknath Shinde ) पदाचा कार्यभार घेताच ठाणे नंतर नवी मुबंईतील सेना नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील ( Corporetor Joint Eknath Shinde Group ) झाले आहेत. आता कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकांनीही काल रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत हम तुम्हारे साथ है या घोषणा देत पाठींबा जाहीर केला. यामध्ये सुमारे ५५ नगरसेवक आणि शिवसेनेचे काही वरिष्ठ पदाधिकारीही असल्याची माहिती आहे.

कल्याण - डोंबिवलीतील ५५ नगरसेवकांचा पाठिंबा जाहीर - ठाणे महानगपालिकेच्या ६७ पैकी ६६ नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन ( Thane 55 Corporetor Joint Eknath Shinde Group ) देऊन काही तासही उलटले नसताना शिवसेनाचा बालेकिल्ला असणाऱ्या कल्याण डोंबिवलीतील ( Kalyan Dombivali ) तब्बल ५५ नगरसेवकांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा जाहीर ( 55 Corporetor Joint Eknath Shinde Group ) केल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. तसेच काही नगरसेवक हे बाहेरगावी आहेत तर काही प्रकृती अस्वास्थ्यामुळे यावेळी उपस्थित राहू शकले नसले तरी अशा सर्व नगरसेवकांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शासकीय निवासस्थानी घेतली भेट - मुंबईतील नंदनवन या शासकीय निवासस्थानी या सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही भेट घेतली ( Visit official residence ). दरम्यान यावेळी उपस्थित नगरसेवक पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबध्द असून हा विकास रथ प्रगतीपथावर नेण्याचे स्वप्न आपण पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

हेही वाचा - Uddhav Thackeray on Rebel MLA Shinde Group : बंडखोरांना न्यायालयाकडून सर्व पातळीवर मदत; नव्या चिन्हाची तयारी ठेवा - उद्धव ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.