ETV Bharat / city

Arif Khan आघाडी सरकारला घरचा आहेर; काँग्रेस नेते आरिफ खान यांची इंधन दर कमी करण्याची मागणी

author img

By

Published : Nov 18, 2021, 9:56 PM IST

Congress leader Arif Khan
काँग्रेस नेते आरिफ खान

राज्य सरकारमध्ये असलेले काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री आरिफ नसीम खान (Arif Naseem khan) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इंधन दर कमी करावेत (fuel price increase) यासाठी पत्र लिहिल आहे. नसीम खान यांनी सरकारला दिलेल्या पत्रामुळे महा विकास आघाडी सरकारला (maha vikas aghadi) घरचा आहेर मिळाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मुंबई - सातत्याने वाढत असलेल्या इंधन दरामुळे (fuel price increase) सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. यामधून सामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलवर दहा रुपये तर, डिझेल वर पाच रुपये दर कमी केले. हे दर कमी केल्यानंतर राज्य सरकारने देखील आपला वॅट कमी करून राज्यातील जनतेला इंधन दरवाढ संदर्भात काहीसा दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली असतानाच राज्य सरकारमध्ये असलेले काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री आरिफ नसीम खान (Arif Naseem khan) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm Uddhav Thackeray) यांना इंधन दर कमी करावेत यासाठी पत्र लिहिल आहे. नसीम खान यांनी सरकारला दिलेल्या पत्रामुळे महा विकास आघाडी सरकारला (maha vikas aghadi) घरचा आहेर मिळाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Congress leader Arif Khan
पत्र

हेही वाचा - Political Analysis : उत्तर प्रदेश निवडणुकीचे पडसाद महाराष्ट्रात उमटतायेत का?

पंजाब राजस्थानच्या सरकार प्रमाणे निर्णय घ्यावा

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई प्रचंड वाढली आहे. मागील सात वर्षांत पेट्रोल डिझेलचे दर (petrol diesel price) वाढवून १०० रुपये प्रति लिटर रुपयांच्यावर गेले आहेत. एलपीजी गॅसही ९०० रुपये झाला आहे. मोदी सरकारने सातत्याने केलेल्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. सामान्य जनतेला या महागाईने जगणे मुश्कील झाले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सर्वच सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पंजाब व राजस्थान सरकारने ज्या पद्धतीने पेट्रोल डिझेलच्या करामध्ये कपात करून जनतेला दिलासा दिला, त्याच पद्धतीने आपल्या राज्यातील जनतेच्या हितासासाठी पेट्रोल डिझेलवरील कर कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

पेट्रोल डिझेलवरील कररुपाने राज्याला मिळणारा पैसा केंद्र सरकार वेळेवर देत नाही, त्यातच सेसच्या पैशातील हिस्सा राज्यांना मिळतच नाही, तो फक्त केंद्र सरकारलाच मिळतो. यातून राज्याची आर्थिक कोंडी होत आहे. परंतु, जनतेला दिलासा देणे आपले कर्तव्य आहे. राज्यातील जनतेच्या हितासाठी महाविकास आघाडी सरकारचे (maha vikas aghadi) प्रमुख म्हणून आपण पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करून दिलासा द्यावा, असे नसीम खान म्हणाले.

इंधन दर (fuel price hike) कमी न करण्यावर उपमुख्यमंत्री ठाम

गेल्या दोन वर्षापासून राज्यावर कोरोनाचे सावट आहे. अशातच राज्य सरकारचे आर्थिक स्त्रोत कमी झाले असून, इंधनावरील कर हा राज्य सरकारच्या आर्थिक स्त्रोताचा मुख्य मार्ग आहे. त्यामुळे, इंधन दर कमी केले जाणार नाही, हे उपमुख्यमंत्री अजित पवार (Minister Ajit Pawar) यांनी स्पष्ट केला आहे.

हेही वाचा - MAHARASHTRA CORONA UPDATE नवीन 963 कोरोना रुग्णांची नोंद; 24 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.