Cabinet Expansion : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; 'या' नेत्यांना मिळणार संधी

author img

By

Published : Aug 8, 2022, 3:26 PM IST

Updated : Aug 8, 2022, 10:04 PM IST

Eknath Shinde

38 दिवस उलटून गेले असले असले तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने विरोधकांसह राज्यभरातून टीका एकनाथ शिंदे सरकारवर ( Eknath Shinde government ) होत होती. मात्र, आता राज्य मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. यासंबंधी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांची जवळपास दोन तास बैठक पार पडली.

मुंबई - राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास 38 दिवस उलटून गेले असले असले तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने विरोधकांसह राज्यभरातून टीका एकनाथ शिंदे सरकारवर ( On Eknath Shinde government ) होत होती. मात्र, आता राज्य मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. यासंबंधी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांची जवळपास दोन तास बैठक पार पडली.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपचे सर्व नेते, आमदार, खासदार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील घरी दाखल झाले आहेत. त्यामुळे रात्रीतच अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

  • Maharashtra | BJP leaders arrive at the residence of Deputy CM Devendra Fadnavis in Mumbai ahead of the cabinet expansion that's likely to take place tomorrow pic.twitter.com/4uxGAMIRlg

    — ANI (@ANI) August 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Rakhi Festival : पुणे शहरात आकर्षक राख्या विक्रीस दाखल; यंदा राख्यांच्या किंमतीत 20 टक्के वाढ

बावीस मंत्र्यांचा शपथविधी उद्या होणार - या बैठकीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार एकनाथ शिंदे गट, भारतीय जनता पक्षातील कोणत्या नेत्यांना संधी द्यायची याबाबत चर्चा झाली. उद्या होणाऱ्या शपथविधीसाठी मंत्र्यांची यादी तयार करण्यात आली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. जवळपास वीस ते बावीस मंत्र्यांचा शपथविधी उद्या होणार ( Ministers sworn in tomorrow ) असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री थोड्याच वेळात राज्यपालांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देणार आहेत. उद्या राजभवनात हा शपथविधी पार पाडला जाईल. आधी विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा शपथ विधी पार पाडला जाईल अशा प्रकारचे देखील शक्यता वर्तनात होती मात्र आता हा शपथविधी राजभवनात पार पाडला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


मंत्रिमंडळात कोणाला स्थान - उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदे गटाकडून दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर, शंभूराजे देसाई, संदिपान भुमरे, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, बच्चू कडू असे दहा जणांचा शपथ विधी पार पडेल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर तेथेच भारतीय जनता पक्षाकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, संजय कुटे, जयकुमार रावल, रवींद्र चव्हाण, बबनराव लोणीकर, नितेश राणे, प्रवीण दरेकर, राम शिंदे, अपक्ष आमदार रवी राणा यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

हेही वाचा - Pimpri Chinchwad Ganeshotsav : गणेश मूर्तीचे दर 30 ते 35 टक्क्यांनी वाढले; पेट्रोल, डिझेल, जीएसटी दरवाढीचा फटका

Last Updated :Aug 8, 2022, 10:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.