ETV Bharat / city

Weather Update : राज्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता; या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

author img

By

Published : Nov 30, 2021, 7:08 PM IST

Updated : Nov 30, 2021, 10:50 PM IST

Chance of rain MH
पुढील 3 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

राज्य अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात ( Chance of Rain in MAHA ) आली आहेत. आज अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहेत व याची तीव्रता 48 तासात वाढणार आहे. यामुळे २ डिसेंबर या कालावधीत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत काही भागात 3 दिवस पावसाची शक्यता ( Rain with Thunderstorm in next 3 days ) आहे.

मुंबई - थंडीत राज्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार झाले आहे. राज्याच्या काही भागात आज आणि उद्या जोरदार पाऊस होण्याची शक्‍यता हवामान विभागाने ( Chance of Rain in MAHA ) वर्तविली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने वातावरणात बदल झाला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यांसह पुढील 3 दिवस ( Rain with Thunderstorm in next 3 days ) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. उद्या पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा ( Orange alert in Maharashtra Four districts) इशारा देण्यात आला असल्याचे हवामान तज्ञ शुभांगी भुत्ते यांनी सांगितले.

'या' भागात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता -

राज्य अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहेत. आज अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहेत व याची तीव्रता 48 तासात वाढणार आहे. यामुळे २ डिसेंबर या कालावधीत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत काही भागात पावसाची शक्यता आहे. आता तीन दिवस पावसाचे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस राज्याच्या अनेक भागात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.

मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता -

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज मंगळवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान वभागने वर्तविली आहे. तर यामध्ये राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा -

दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती येत्या २४ तासात दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची निर्माण शक्यता आहे. पुढचे ३ दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. उद्या पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना ऑरेंज इशारा देण्यात आला असल्याचे मुंबईतील हवामान तज्ञ शुभांगी भुत्ते यांनी सांगितले.

हेही वाचा - Omicron Corona new Variant : दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

Last Updated :Nov 30, 2021, 10:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.