ETV Bharat / city

Central Railway : मध्य रेल्वेचा माल वाहतुकीत उच्चांक ; एका वर्षात 38 लाख टन वाहतूक

author img

By

Published : Oct 2, 2022, 5:46 PM IST

मध्य रेल्वेने आतापर्यंत 38 लाख टन माल वाहतूक केलेली (Central Railway ranks high in freight traffic) आहे. माल वाहतुकीमधला हा मध्य रेल्वेचा एका वर्षातील उच्चांक आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या सहामाहीत मध्य रेल्वेने 38 दशलक्ष टन मालवाहतूक लोडींग (Central Railway freight traffic 38 lakh tonnes) केली.

Mumbai Central Railway
मुंबई मध्य रेल्वे

मुंबई : मध्य रेल्वेने आतापर्यंत 38 लाख टन माल वाहतूक केलेली आहे. माल वाहतुकीमधला हा मध्य रेल्वेचा एका वर्षातील उच्चांक (Central Railway ranks high in freight traffic) आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या सहामाहीत मध्य रेल्वेने 38 दशलक्ष टन मालवाहतूक लोडींग केली. ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरलेली आहे. केवळ 30 दिवसातील कामगिरीत सप्टेंबरमधील सर्वोत्कृष्ट 5.66 दशलक्ष टन लोडिंग केलेली (Central Railway freight traffic 38 lakh tonnes)आहे.



गेल्या वर्षी याच कालावधीतील पहिल्या सहामाहीतील मालवाहतूक लोडींगमध्ये 9 टक्वे वाढ झाली. सप्टेंबर 2021 च्या तुलनेत सप्टेंबर 2022 मध्ये NTKM मध्ये 14.5 टक्वेवाढ केली. सप्टेंबर 2022 मध्ये रु.571.05 कोटी मालवाहतूक महसूल प्राप्त झाला. सप्टेंबर 2021 च्या तुलनेत 12.5 टक्वे ​​वाढ केली.


आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट लोडिंग साध्य - आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल-सप्टेंबर) मध्य रेल्वेचे 38 दशलक्ष टन मालवाहू लोडिंग हे आर्थिक वर्ष 2021-22 च्या याच कालावधीपेक्षा 9 टक्वेने वाढले आहे. जे आतापर्यंतचे सर्वोत्तम लोडिंग आहे. निव्वळ टन किलोमीटर (NTKMs) सप्टेंबर 2021 च्या तुलनेत सप्टेंबर 2022 मध्ये 14.5 टक्वेनी वाढले आहे. सप्टेंबर 2022 मध्ये 5.66 दशलक्ष टन लोडिंगचे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट लोडिंग देखील साध्य केले. मालवाहतुकीच्या महसुलाच्या बाबतीत, सप्टेंबर 2021 मधील रु. 507.42 कोटी वरुन सप्टेंबर 2022 मध्ये रु. 571.05 कोटी इतकी म्हणजेच 12.54 टक्के झाली (Central Railway ranks high in freight traffic) आहे.


मध्य रेल्वेने सप्टेंबर 2021 मध्ये लोड केलेल्या ऑटोमोबाईल्सच्या 26 रेकच्या तुलनेत सप्टेंबर 2022 मध्ये ऑटोमोबाईल्सचे 102 रेक लोड केले. मध्य रेल्वेत सप्टेंबर 2021 मध्ये कंटेनरच्या 624 रेक लोडींगच्या तुलनेत सप्टेंबर 2022 मध्ये कंटेनरचे 716 रेक लोड केले गेले. सप्टेंबर 2021 मधील 86 रेकच्या तुलनेत सप्टेंबर 2022 मध्ये 140 लोखंड आणि स्टीलचे रेक लोड केले गेले. पेट्रोलियम उत्पादनेचे 216 रेक सप्टेंबर 2022 मध्ये लोड केली गेले आहेत. त्या तुलनेत मागील वर्षीच्या याच महिन्यात 172 रेक लोड केले होते. जिप्समचे 11 रेक देखील सप्टेंबर 2022 मध्ये लोड केले गेले (Mumbai Central Railway)आहेत.

पायाभूत सुविधांच्या सुधारणांमुळे वाढ - मुंबई विभागाने सप्टेंबर 2022 मध्ये धरमतर बंदर साईडिंगवरून आयातीत कोळशाचे 26 रेक लोड केले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री अनिल कुमार लाहोटी यांच्याशी संवाद साधला असता म्हणाले की, नागपूर विभागाने सप्टेंबर 2022 मध्ये बल्हारशाह येथून लोहखनिजाचे 41 रेक लोड केले होते .त्या तुलनेत सप्टेंबर 2021 मध्ये एकही रेक लोड केला नव्हता. मालवाहतुकीत वाढ ही मध्य रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या सुधारणांसह मध्य रेल्वेने घेतलेल्या व्यवसाय विकासाच्या अनेक उपक्रमांमुळे झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.