ETV Bharat / city

Anil Parab Dapoli Resort अनिल परबांच्या अनधिकृत रिसॉर्टवर पडणार हातोडा, भाजपा नेते किरीट सोमैयांची माहिती

author img

By

Published : Aug 22, 2022, 8:01 PM IST

Anil Parab Dapoli Resort
Anil Parab Dapoli Resort

अनिल परब यांचा दापोली येथील रिसॉर्ट Anil Parab Dapoli Unauthorized Resort हा अनधिकृत असून तो पाडण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमैया BJP leader Kirit Somaiya यांनी कंबर कसली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून हा रिसॉर्ट तोडण्याचे अंतिम आदेश केंद्रीय पर्यावरण विभागाने महाराष्ट्राच्या पर्यावरण विभागाला दिल्याची माहिती किरीट सोमैया यांनी दिली आहे.

मुंबई - शिवसेना नेते माजी परिवहन मंत्री अनिल परब यांचा दापोली येथील रिसॉर्ट Anil Parab Dapoli Unauthorized Resort हा अनधिकृत असून तो पाडण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमैया BJP leader Kirit Somaiya यांनी कंबर कसली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून हा रिसॉर्ट तोडण्याचे अंतिम आदेश केंद्रीय पर्यावरण विभागाने महाराष्ट्राच्या पर्यावरण विभागाला दिल्याची माहिती किरीट सोमैया यांनी दिली आहे. विधान भवनात ते बोलत होते.



'रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना रिसॉर्ट तोडण्यास उद्या सांगण्यात येईल' : शिवसेना नेते व राज्याचे माजी परिवहन मंत्री यांना केंद्राच्या पर्यावरण खात्याने मोठा झटका दिला आहे. परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टचे बांधकाम तोडण्यासाठी भारत सरकारच्या पर्यावरण खात्याने राज्याच्या पर्यावरण विभागाला आदेश दिले आहेत. भाजपा नेते किरीट सोमैया यांनी दापोली मुरुड येथे कोविड काळात अनिल परब यांनी अनाधिकृत साई रिसॉर्ट बांधतांना सीआरझेड नियमांचे उल्लंघन करुन बांधले, अशी तक्रार सबंधित कार्यालयात केली होती. त्याचबरोबर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ही केली होती. अखेर आज केंद्रीय पर्यावरण विभागाने राज्याच्या पर्यावरण विभागाला अनिल परब यांचा रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत.


यापूर्वी दिली होती नोटीस : साई रिसॉर्ट एन एक्स हे दोन मजली अनधिकृत रिसॉर्ट आहे. सी कौंच बीच रिसॉर्ट हा तळ मजला व पहिला मजला आणि दुसऱ्या मजल्यावरील स्ट्रक्चर कव्हर करण्यात आले आहे. या रिसॉर्टमध्ये प्रवेश करण्यासाठी समुद्राच्या वाळूतून अनधिकृत रस्ता दिला गेला आहे. गेल्या २ ते ३ वर्षात हे बांधकाम करण्यात आले आहे. भाजपा नेते किरीट सोमैया यांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी जून २०२१ मध्ये या दोन्ही अनधिकृत रिसॉर्टची पाहणी केली होती. त्याचा अहवाल केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला पाठवला होता. त्या अंतर्गत ही कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. आता अखेर हा रिसॉर्ट पाडण्याचे आदेश राज्याच्या पर्यावरण विभागाला दिले असून रत्नागिरी जिल्हाधिकारी आता याबाबत अंतिम कारवाई करणार आहे.


बांधकाम पाडण्यासाठी येणारा खर्च परब यांच्याकडून वसूल करणार? : रिसॉर्ट पाडण्यासाठी होणारा खर्च तसेच हे अनधिकृत बांधकाम करताना पर्यावरणाची जी काही हानी झाली आहे. त्याचे असे एकूण साडेचार कोटी रुपये सुद्धा परब यांच्याकडून वसूल करावेत हे मागणी सुद्धा सोमैया यांनी केली आहे. अनिल परब यांच्याकडे आलेला पैसा हा सचिन वाझे यांच्याकडून आला का याची ही चौकशी होणार असून माजी मंत्री अस्लम शेख यांच्या आदेशाने २८ रिसॉर्ट बांधण्यात आले ते बेकायदेशीर आहेत व त्यावरही लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे सोमैया म्हणाले.

हेही वाचा - Ajit Navale Criticized CM Shinde दहीहंडी खेळणाऱ्यांना आरक्षण म्हणजे दिवाळखोरीचे लक्षण, अजित नवलेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.