ETV Bharat / city

लवकरच अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक होणार - किरीट सोमैया

author img

By

Published : Aug 6, 2021, 5:27 PM IST

Updated : Aug 6, 2021, 5:35 PM IST

किरीट सोमैय्या
किरीट सोमैय्या

अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर पुन्हा एकदा भाजपा नेते किरीट सोमैया यांनी अनिल देशमुख हे बेपत्ता असल्याचा आरोप केला आहे. मात्र अनिल देशमुख सध्या बेपत्ता असले तरी येणाऱ्या काळात लवकरच त्यांना अटक होईल, असे मत किरीट सोमैय्या यांनी या कारवाईनंतर व्यक्त केले आहे.

मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आजही ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. नागपूरच्या फेट्री शिवारातील माहुरझरी परिसरात श्रीसाई शिक्षण संस्थेचे नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी कॅम्पसमध्ये दुपारी 12 वाजताच्या सुमाराला ईडीचे अधिकारी पोहचले. या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल देशमुख, पत्नी आणि मुलगा ऋषिकेश यामध्ये संचालक पदावर आहेत. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर पुन्हा एकदा भाजपा नेते किरीट सोमैया यांनी अनिल देशमुख हे बेपत्ता असल्याचा आरोप केला आहे. मात्र अनिल देशमुख सध्या बेपत्ता असले तरी येणाऱ्या काळात लवकरच त्यांना अटक होईल, असे मत किरीट सोमैया यांनी या कारवाईनंतर व्यक्त केले आहे.

भाजपा नेते किरीट सोमैया

अनिल देशमुखांच्या 'या' ठिकाणच्या निवासस्थानावर झाली होती छापेमारी

या आधीही नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि वडविहिर येथील निवासस्थानी ईडीने धाड टाकली होती. नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिर येथे देशमुख यांचे वडिलोपार्जित घर आहे. त्या ठिकाणी ईडीने छापेमारी केली. ईडीच्या कारवाईनंतर गेले काही दिवस माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे समोर आलेले नाहीत. मात्र अनिल देशमुख हे कोठेही गेले नाहीत ते देशातच आहेत, असे स्पष्टीकरण नवाब मलिक यांच्याकडून देण्यात आले होते. या अगोदर अनिल देशमुख यांच्या दोन निकटवर्तीयांना देखील याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता त्यांच्या कोटोल येथील वडिलोपार्जित घरावर ईडीकडून छापेमारी झाली होती.

'ही' आहे प्रकरणाची पार्श्वभूमी

मुंबईतील हॉटेल मालकांकडून अवैधरित्या शंभर कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर पत्र लिहून केला होता. 20 मार्च रोजी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा आरोप केला होता. या आरोपानंतर उच्च न्यायालयात देखील याबाबत याचिका देखील दाखल करण्यात आली होती. या आधारावर ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर 2 जुलैला छापेमारी करण्यात आली. मुंबई, नागपूर आणि गृहमंत्री असताना त्यांना देण्यात आलेले शासकीय निवासस्थानी या ठिकाणी हे धाड सत्र करण्यात आले. या धाडीनंतर देशमुख यांनी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे, यासाठी आतापर्यंत तीन वेळा समन्स बजावण्यात आला आहे. तर तिथेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनाही ईडीने चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचा समन्स बजवलेला आहे. यासोबतच शंभर कोटींच्या आरोपाबाबत अनिल देशमुख यांची सीबीआयकडून देखील चौकशी करण्यात आली होती.

हेही वाचा - breaking : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील शैक्षणिक संस्थेवर ईडीकडून छापेमारी

Last Updated :Aug 6, 2021, 5:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.