ETV Bharat / city

'त्यांनी' तर दहशतवाद्यांना पाठिंबा दिला... 'लव्ह जिहाद' प्रकरणात किरीट सोमैयांची उडी

author img

By

Published : Nov 21, 2020, 4:28 PM IST

भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी लव्ह जिहाद प्रकरणात उडी घेतली आहे. त्यांनी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलेल्या वक्तव्यास प्रत्युत्तर दिले आहे.

kirit somaiya on love jihad
'त्यांनी' तर दहशतवाद्यांना पाठिंबा दिला... 'लव्ह जिहाद' प्रकरणात किरीट सोमैयांची उडी

मुंबई - देशभरात विविध राज्यांमध्ये लव्ह जिहाद कायद्याविरोधात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकार हा कायदा लागू करणार का, याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

'त्यांनी' तर दहशतवाद्यांना पाठिंबा दिला... 'लव्ह जिहाद' प्रकरणात किरीट सोमैयांची उडी

यातच भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी लव्ह जिहाद प्रकरणात उडी घेतली आहे. त्यांनी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलेल्या वक्तव्यास प्रत्युत्तर दिले आहे. देशद्रोही याकूब मेमनच्या फाशीचा विरोध करणारे तसेच फेनेटिक टेरेरिस्ट इस्लामिक संघटनेला पाठिंबा दर्शवणारे अस्लम शेख यांच्या वक्तव्याचा निषेध करत असल्याचे सोमैय्या यांनी सांगितले. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या भगव्याचा रंग बदलला आहे, असा आरोप सोमैयांनी केला. त्यामुळे ठाकरे सरकार अशा प्रकारचा कायदा आणणार नाही. लव्ह जिहाद विरोधातील कायदा, भाजपा सरकार आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोणत्याही राज्यात असा कायदा आणणं म्हणजे मूर्खपणा

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी लव्ह जिहाद प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. राज्यात लव्ह जिहादसारख्या कोणत्याही कायद्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. देशात कोणत्याही सरकारने लव्ह जिहादसारख्या संकल्पनांविरोधात कायदा आणणे, हा मूर्खपणा असल्याचे त्यांनी म्हटले. ज्या सरकारांना राज्यांतर्गत विषमता लपवायची इच्छा आहे, अशी सरकारं हे कायदे आणत आहेत, असे ते म्हणाले.

देशात सर्वांना आपापला साथी निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. हा देश धर्माच्या नाही, तर संविधानाच्या मार्गावर चालतो. त्यामुळे कोणीही जबरदस्ती करून हा कायदा लागू करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. तसे झाल्यास कायद्यातील तरतुदींनुसार आवाज उठवण्याचा अधिकार प्रत्येकाला असल्याचे शेख यांनी अधोरेखित केले. तसेच शिवसेनेला कोणाच्याही हिंदुत्त्वाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.

लव्ह जिहाद प्रकरण

भाजपाचे योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेश सरकारने लव्ह जिहाद या संकल्पनेविरोधात कायदा पारित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील बोलावली. लव्ह जिहाद विरोधात पाऊल उचलण्यासाठी भाजपा आक्रमक झाल्याचे दिसले. उत्तर प्रदेशसोबतच शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री असलेले मध्यप्रदेश सरकार देखील हा कायदा पारित करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपा आणि हिंदुत्त्ववादी संघटनांनी लव्ह जिहाद कायद्याला मोठ्या प्रमाणात समर्थन दर्शवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.