ETV Bharat / city

Mumbai mayors threat matter: मुंबई महापौरांना पत्राद्वारे धमकी दिल्याप्रकरणी भायखळा पोलिसांचा तपास सुरू

author img

By

Published : Dec 11, 2021, 3:46 PM IST

महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Mayor Kishori Pednekar )यांनी आशिष शेलार यांच्यावर मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या शासकीय निवासस्थानी धमकीचे पत्र मिळाले होते. त्यामध्ये दादाला त्रास दिल्यास वाईट परिणाम होईल, असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणाची माहिती भायखळाला पोलिसांना ( Bhaykhala Police ) देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भायखळा पोलीस स्टेशन
भायखळा पोलीस स्टेशन

मुंबई- मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Mayor Kishori Pednekar ) यांना ( 10 नोव्हेंबर ) रोजी अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे पत्र आल्यानंतर महापौरांकडून भायखळाला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. भायखळा पोलिसांनी या प्रकरणी विजेंद्र म्हात्रे याच्यावर गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्यावर मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या शासकीय निवासस्थानी धमकीचे पत्र मिळाले होते. त्यामध्ये दादाला त्रास दिल्यास वाईट परिणाम होईल, असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणाची माहिती भायखळाला पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा-Ashish Shelar on Police case: जितका आवाज दाबला जाईल तितक्याच ताकदीने समोर येऊ - आशिष शेलार

पत्रावर रायगड आणि मुंबईचा पत्ता

महापूर किशोरी पेडणेकर यांना मिळाल्या पत्रावर दोन पत्ते आहेत. पत्राच्या आतील भागांमध्ये उरण रायगड श्री माळी कॉम्प्लेक्स ऊरा रोड उरण रायगड असा पत्ता आहे. तर पत्राच्यावरील भागावर पालघर नवी मुंबई येथील पत्ता आहे. यासंदर्भात भायखळा पोलीस अधिक तपास करत आहे. मात्र त्या ठिकाणी विजेंद्र मात्रे नावाचे कोणीही व्यक्ती राहत नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.

हेही वाचा-Mumbai Mayor Death Threats : महापौरांनी केली भायखळा पोलिस स्टेशनला तक्रार

भायखळा पोलीस स्टेशनकडून तपास सुरू-

महापौर धमकी प्रकरणासंदर्भात भायखळा पोलीस स्टेशनचे अधिकार्‍यांशी संपर्क केला असता या प्रकरणात तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.

हेही वाचा-Women Commission on Ashish shelar : आशिष शेलार यांचे मुंबई महापौरांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य, महिला आयोगाकडून दखल

नुकतेच आमदार शेलार यांच्याविरोधातही केली होती तक्रार

आमदार आशिष शेलार यांनी वरळी बीडीडी चाळीत झालेल्या सिलेंडर ब्लास्ट मध्ये मृत्युमुखी पडलेल्या ४ महिन्याच्या चिमुकल्या बद्दल बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल भाजप पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह विधान केले होते. याबाबत महापौर किशोर पेडणेकर यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात स्वतः जाऊन आमदार आशिष शेलार यांच्या विरुद्ध तक्रार दिली होती. त्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार आशिष शेलार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.