ETV Bharat / city

Mumbai Mayor Death Threats : महापौरांनी केली भायखळा पोलिस स्टेशनला तक्रार

author img

By

Published : Dec 10, 2021, 7:05 PM IST

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांना मिळालेल्या पत्रात अज्ञात व्यक्तीने अश्लील भाषा वापरून कुटुंबियांना (Mumbai Mayor Death Threats) जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

Mumbai Mayor
Mumbai Mayor

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेना असा सामना रंगला आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांच्यातील वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. त्यातच आता महापौरांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र (Mumbai Mayor Death Threats) आले आहे.

गेल्यावर्षीही महापौरांना फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. महापौर झाल्यापासून किशोरी पेडणेकरांना दुसऱ्यांदा धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज भायखळा पोलिस स्टेशनला तक्रार दिली.

महापौरांना जीवे मारण्याची धमकी -

त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना म्हणाल्या की, काल माझ्या जुन्या निवासस्थानी मला पत्र आले होते. सदर पत्र उघडले असता, माझ्या विषयी अतिशय अश्लील भाषा वापरून मला व माझ्या कुटुंबातील व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या पत्रात माझ्याविषयी असलेला मजकूर हा अतिशय लज्जास्पद असून महिलांची विटंबना करणारा तसेच माझ्यासहित समस्त महिला वर्गाला वेदनादायी व क्लेशदायक असा आहे. सदर विषयाबाबत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र तसेच स्थानिक भायखळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आलेली आहे.

कारवाई व पोलीस संरक्षणाची मागणी -
सदर पत्रावर विजेंद्र म्हात्रे असे नाव नमूद करण्यात आले आहे. मागील दोन-तीन दिवसातील घडामोडींचा विचार करता व प्राप्त पत्रातील मजकूर लक्षात घेता सदर व्यक्तीचा तातडीने शोध घ्यावा. आणि त्याला अटक करण्याचे आदेश संबंधितांना देण्याची मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील यांना दिलेल्या पत्रात केली आहे. तसेच मला व माझ्या कुटुंबीयांना त्वरित विशेष पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी महापौरांनी केली आहे.

हेही वाचा - Mumbai Mayor Death Threats : मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.