ETV Bharat / city

Cancer Hospital in Nagpur : नागपुरात लवकरच कर्करोग रुग्णालय - अमित देशमुख यांची विधानसभेत माहिती

author img

By

Published : Dec 24, 2021, 5:26 AM IST

अमित देशमुख
अमित देशमुख

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख ( Amit Deshmukh info on cancer Hospital ) म्हणाले, की सरकारने कोरोना प्रतिबंधासाठी व उपचारांसाठी प्रयत्न सुरू केले. नागपूर येथील रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून कर्करोग इन्स्टिट्युट ( Cancer Institute in Nagpur ) उभारण्यात येईल. नागपूर येथील या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी लागणारी यंत्रसामुग्री, उपकरणे, आस्थापनेवरील मनुष्यबळ या सर्वांसाठी प्रयत्न केले जातील.

मुंबई - नागपूर येथे कर्करोग रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित ( cancer hospital in Nagpur Soon ) असून लवकरच बांधकामाला सुरुवात होईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी माहिती ( Amit Deshmukh on Nagpur Cancer Hospital ) हिवाळी अधिशनादरम्यान दिली.

विधान परिषदेचे सदस्य गिरीश व्यास, डॉ. रणजित पाटील ( MLA Dr Ranjit Patil question in assembly ) , अमरनाथ राजूरकर, नागोराव गाणार, अभिजीत वंजारी यांनी नागपूरमधील कर्करोग रुग्णालयाचा प्रश्न उपस्थित केला होता.


हेही वाचा-कर्करोग उपचारासाठी जपानने करावे अर्थसहाय्य; आरोग्यमंत्री टोपे यांची मागणी


यावर उत्तर देताना, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख ( Amit Deshmukh info on cancer Hospital ) म्हणाले, की या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर कोरोनाची पहिली आणि नंतर दुसरी लाट आली. सरकारने कोरोना प्रतिबंधासाठी व उपचारांसाठी प्रयत्न सुरू केले. नागपूर येथील रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून कर्करोग इन्स्टिट्युट ( Cancer Institute in Nagpur ) उभारण्यात येईल, असेही देशमुख म्हणाले. नागपूर येथील या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी लागणारी यंत्रसामुग्री, उपकरणे, आस्थापनेवरील मनुष्यबळ या सर्वांसाठी प्रयत्न केले जातील.

हेही वाचा-ठाण्यात कर्करोगावर होणार उपचार; रुग्णालय उभारण्यास राज्य शासनाचा हिरवा कंदील


70 टक्के कर्करोग हा जीवन पद्धतीशी संबंधित

देशात सर्वाधिक कर्करोगाचे प्रमाण हे तंबाखू खाणे, धूम्रपान करणे, अल्कोहोल घेणे यात आहे. 40 टक्के भारतातील जो कर्करोग आहे, तो डायरेक्ट तंबाखूशी संबंधित आहे. दुसरा प्रकार येतो लठ्ठपणा. लठ्ठपणा हा शहरीकरणामुळे वाढत चाललेला आहे. या लठ्ठपणामुळे 13 प्रकारचे कर्करोग होतात. लठ्ठपणामुळे आपले फॅक्टसेल वाढल्याने कर्करोग होण्याचे प्रमाणही वाढत जाते. 70 टक्के कर्करोग हा जीवन जगण्याच्या पद्धतीशी संबंधित असल्याने आपण काय खातो, कसे राहतो यावर सर्व काही अवलंबून असते. त्यामुळे आपण अमेरिकन जीवन पद्धती सोडून भारतीय पद्धतीच अवलंबली ( Lifestyle change to avoid cancer ) पाहिजे, अशी माहिती ज्येष्ठ कर्करोगतज्ञ डॉ. मिनेश जैन यांनी दिली.

संबंधित बातमी वाचा-अमेरिकन जीवनपद्धतीमुळे तरुणांमध्ये कर्करोगाच्या प्रमाणात वाढ

कोणकोणते कर्करोग होतात

स्तनांचा कर्करोग, कोलोरेक्टल कर्करोग, फुफ्फुसंचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, थायरॉइडचा कर्करोग यासारखे प्रकार सामान्यता महिलांमध्ये सर्वात जास्त आढळतात. तर पुरुषांना फुफ्फुस, प्रोस्टेट, कोलोरेक्टल, पोट आणि यकृताच्या कर्करोगाचा धोका असतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.