ETV Bharat / city

Sworn in ceremony : देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांचा 1 जुलैला होणार शपथविधी, सुत्रांची माहिती

author img

By

Published : Jun 30, 2022, 6:44 AM IST

30 जूनला देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेऊन ( Devendra Fadnavis sworn in ceremony ) सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती आहे. तसेच, 1 जुलैला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री, तसेच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशा प्रकारची माहिती ( Shinde sworn in ceremony in Maharashtra ) सूत्रांकडून मिळत आहे.

Devendra Fadnavis sworn in ceremony
देवेंद्र फडणवीस शपथविधी

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. 30 जूनला देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेऊन ( Devendra Fadnavis sworn in ceremony ) सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती आहे. तसेच, 1 जुलैला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री, तसेच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशा प्रकारची माहिती ( Shinde sworn in ceremony in Maharashtra ) सूत्रांकडून मिळत आहे.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे राज भवणावर;राज्यपालांकडे सादर केला राजीनामा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत आपण राजीनामा देत असल्याची घोषणा आपल्या भाषणातून केली. त्यांच्या राजीनाम्याची बातमी कळताच भारतीय जनता पक्षामध्ये उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला.

एक तारखेला दहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता - 1 जुलैला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा शपथविधी पार पडेल. मात्र त्यांच्या सोबत अजून आठ ते दहा मंत्री पहिल्यांदा शपथ घेतील आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. भारतीय जनता पक्षाकडून पाच ते सहा मंत्री, तर एकनाथ शिंदेच्या गटाकडून चार ते पाच मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अध्याप दोन्ही गटामध्ये खातेवाटप बाबत चर्चा झाली नसल्याची माहिती आहे.

मुख्यमत्र्यांनी दिला राजीनामा - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 30 जून रोजी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. यावर शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी आक्षेप घेतला होता. यासंबंधी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने फ्लोअर टेस्ट संदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने तिन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल देण्यासाठी अर्धा तास घेतला होता. त्यांनतर सर्वोच्च न्यायालयाने उद्याच (30 जून) बहुमत चाचणी घेण्यात यावी, ( SC Decision About Assembly Floor Test ) असा निर्णय दिला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे लाईव्ह आले. त्यांनी सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले. आणि नंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजीनामा सुपुर्द केला.

हेही वाचा - Ashok Chavan on government : सरकार अकाली कोसळल्याची खंत संपूर्ण महाराष्ट्राला- अशोक चव्हाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.