ETV Bharat / city

Gunratna Sadavarte : सदावर्ते यांच्या घरात सापडली नोटा मोजायची मशीन

author img

By

Published : Apr 20, 2022, 9:48 AM IST

note counting machine Gunratna Sadavarte
नोट मोजण्याची मशीन गुणरत्न सदावर्ते घर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओकवर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला ( Gunratna Sadavarte news ) केला होता. या हल्ल्याच्या कटात समाविष्ट असलेले आरोपी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते ( Note counting machine Gunratna Sadavarte house ) यांच्या घरी सुरू असलेल्या तपासादरम्यान नोटा मोजण्याची मशीन सापडल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओकवर एसटी कर्मचाऱ्यांनी ( Gunratna Sadavarte news ) हल्ला केला होता. या हल्ल्याच्या कटात समाविष्ट असलेले आरोपी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते ( Note counting machine Gunratna Sadavarte house ) यांच्या घरी सुरू असलेल्या तपासादरम्यान नोटा मोजण्याची मशीन सापडल्याची माहिती समोर येत आहे. आज पुन्हा एकदा सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यामुळे, नोटा मोजायची मशीन घेण्याबाबतचे कारण कोर्टासमोर आज येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - मुंबईसाठी पावसाळ्याचे २२ दिवस धोक्याचे, समुद्राला मोठी भरती

यासोबतच तपासादरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे देखील पोलिसांच्या हाती लागली आहेत. सदावर्ते यांनी गेल्या काही दिवसांत एक लक्झरी कार, मुंबईच्या परळ भागात गाळ खरेदी केला असून, भायखळामध्ये मालमत्ता खरेदी करण्याची तयारी असल्याचेही पोलीस चौकशीत समोर आले आहे. याबाबत पोलीस चौकशी करत असून, आज त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर याबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून घेतलेल्या पैशातून अनेक मालमत्ता खरेदी केली असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी अजित मगरे, संदीप गोडबोले आणि मनोज मुदलियार या तिघांना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले होते. घरावर हल्ला करण्याआधी त्या परिसराची रेकी करण्यात आली होती. सदावर्ते यांच्या इमारतीच्या गच्चीवर सात एप्रिलला झालेल्या बैठकीत मुदलियार उपस्थित होता. त्यामुळे, या तिघांची चौकशी करण्याची गरज असल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले. या तिघांनाही कोर्टाने 22 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा - CM Uddhav Thackeray : राज्यात ८ हजार मेगावॅट औष्णिक वीजनिर्मिती करा : मुख्यमंत्र्यांचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.